यशया 43:18-21
“पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. वनपशू, कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील; कारण मी आपल्या लोकांना, आपल्या निवडलेल्यांना, पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार; मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील.
यशया 43:18-21