इब्री 4:8-13
कारण यहोशवाने त्यांना विसावा दिला असता तर त्यानंतर तो (देव) दुसर्या दिवसाविषयी बोलला नसता. म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. कारण जो ‘कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे’ त्यानेही, जसा ‘देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला’, तसा ‘आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे.’ म्हणून त्या ‘विसाव्यात येण्याचा’ आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की, त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेले आहे.
इब्री 4:8-13