इफिसकरांस पत्र 6:12-20
कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. ह्या कारणास्तव तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्वकाही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा; शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा. माझ्यासाठीही विनवणी करा की, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्या-साठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावेत, ह्यासाठी की, जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे.
इफिसकरांस पत्र 6:12-19,20