अनुवाद 30:15-20
पाहा, जीवन व सुख, आणि मरण व दुःख हे आज मी तुझ्यापुढे ठेवले आहेत; तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गांनी चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ, ही आज्ञा आज मी तुला देत आहे; म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल; पण तुझे मन फिरले व तू ऐकले नाहीस आणि बहकून जाऊन अन्य देवांना दंडवत घातलेस व त्यांची सेवा केलीस, तर तुझा खात्रीने नाश होईल आणि यार्देन ओलांडून जो देश तू वतन करून घेण्यास जात आहेस तेथे तू फार दिवस राहणार नाहीस, हे मी आज तुला बजावून सांगतो. आकाश व पृथ्वी ह्यांना तुझ्याविरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की, जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवले आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायू होशील; तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याशी शपथ वाहिली होती त्यात तुझी वस्ती होईल.”
अनुवाद 30:15-20