YouVersion लोगो
सर्च आयकॉन

कलस्सै 3:1-14

कलस्सै 3:1-14 - म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा.
वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.
कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे.
आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल2 तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.3
तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ — ह्याला मूर्तिपूजा म्हणावे — हे जिवे मारा;
त्यामुळे आज्ञा मोडणार्‍या मुलांवर देवाचा कोप होतो.
तुम्हीही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता तेव्हा त्यांमध्ये तुम्ही चालत होता.
परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणांपासून दूर करा.
एकमेकांशी लबाडी करू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे;
आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.
ह्यात हेल्लेणी व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही; तर ख्रिस्त सर्वकाही, आणि सर्वांत आहे.
तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा;
एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गार्‍हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा;
पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा.

म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल2 तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.3 तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ — ह्याला मूर्तिपूजा म्हणावे — हे जिवे मारा; त्यामुळे आज्ञा मोडणार्‍या मुलांवर देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता तेव्हा त्यांमध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे, ही सर्व आपणांपासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे; आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. ह्यात हेल्लेणी व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही; तर ख्रिस्त सर्वकाही, आणि सर्वांत आहे. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गार्‍हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा.

कलस्सै 3:1-14

कलस्सै 3:1-14