YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 9:6-11

२ करिंथ 9:6-11 - हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.
प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो.
सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे.
“तो चहूकडे वाटप करीत असतो;
दरिद्र्यांस दानधर्म करीत असतो;
त्याचे नीतिमत्त्व युगानुयुग राहते,”
असे शास्त्रात लिहिले आहे.
जो ‘पेरणार्‍याला बी’ पुरवतो व ‘खाण्याकरता अन्न’ पुरवतो तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील.
म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल; त्या औदार्यावरून आमच्या द्वारे देवाचे आभारप्रदर्शन होते.

हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे. “तो चहूकडे वाटप करीत असतो; दरिद्र्यांस दानधर्म करीत असतो; त्याचे नीतिमत्त्व युगानुयुग राहते,” असे शास्त्रात लिहिले आहे. जो ‘पेरणार्‍याला बी’ पुरवतो व ‘खाण्याकरता अन्न’ पुरवतो तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल; त्या औदार्यावरून आमच्या द्वारे देवाचे आभारप्रदर्शन होते.

२ करिंथ 9:6-11

२ करिंथ 9:6-11