२ करिंथ 5:14-18
कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले; आणि तो सर्वांसाठी ह्याकरता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वत:करता नव्हे, तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही; आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती1 आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे; त्याने स्वत:बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली
२ करिंथ 5:14-18