1 तीमथ्य 4:7-10
अनीतीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा; आणि सुभक्तीविषयी कसरत कर; कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतींत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. ह्याचसाठी आम्ही श्रम व खटपट करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणार्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.
1 तीमथ्य 4:7-10