1 तीमथ्य 2:2-10
राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकार्यांकरता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे. कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले ह्याची साक्ष यथाकाळी द्यायची आहे. ह्या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित (मी ख्रिस्ताठायी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही), विश्वास व सत्य ह्यांसंबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. तसेच स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणांस भीडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोती व मोलवान वस्त्रे ह्यांनी नव्हे, तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांना शोभते तसे सत्कृत्यांनी आपणांस शोभवावे.
1 तीमथ्य 2:2-10