1 योहान 4:19-21
पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. “मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे.
1 योहान 4:19-21