जखर्या 8:20-23
जखर्या 8:20-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पुष्कळ नगराचे लोक यरूशलेमेला येतील. निरनिराळ्या नगरातील लोक एकमेकांना भेटतील व म्हणतील, ‘आम्ही सेनाधीश परमेश्वराची कृपा मिळवू व त्यास शोधू.’ मीही येतो.” पुष्कळ लोक आणि बलिष्ठ राष्ट्रे, सेनाधीश परमेश्वराच्या शोधात आणि त्याची कृपा मिळवण्यास यरूशलेमेत येतील. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी, वेगवेगळ्या भाषा बोलणारे दहा लोक यहूदी मनुष्याकडे येऊन त्याचा झगा पकडून त्यास विचारतील, ‘देव तुम्हाबरोबर आहे’ असे आम्ही ऐकले आहे! आम्ही तुम्हाबरोबर येतो.”
जखर्या 8:20-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो : राष्ट्रे व अनेक नगरांचे रहिवासी येतील अशी वेळ येईल; एका नगराचे रहिवासी दुसर्या नगरास जाऊन म्हणतील, ‘आपण त्वरेने जाऊन परमेश्वराजवळ अनुग्रह मागू व सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागू; मीही जातो.’ पुष्कळ लोक व असमर्थ राष्ट्रे यरुशलेमेत सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागण्यास व परमेश्वराजवळ अनुग्रह मागण्यास येतील. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसांत सर्व भाषा बोलणार्या राष्ट्रांपैकी दहा जण यहूदी माणसाचा पदर धरून म्हणतील, ‘आम्ही तुमच्याबरोबर येतो, कारण देव तुमच्याबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”’