YouVersion लोगो
सर्च आयकॉन

जखर्‍या 13:2-9

जखर्‍या 13:2-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी देशांतील सर्व मूर्तींचे मी उच्चाटन करीन. लोकांस त्यांची नावेसुध्दा आठवणार नाहीत. मी ढोंगी संदेष्ट्यांचा आणि अशुद्ध आत्म्यांचा नायनाट करीन. एखाद्याने भविष्य वर्तविणे चालूच ठेवले, तर त्यास शिक्षा केली जाईल. त्याचे आईवडील ज्यांनी त्यास जन्म दिला ते त्यास म्हणतील, ‘परमेश्वराच्या नावाने तू खोटे बोललास तेव्हा तुला मरणाशिवाय गत्यंतर नाही.’ भविष्य वर्तविल्याबद्दल त्याचे आईवडील त्यास भोसकतील. त्यावेळी प्रत्येक संदेष्ट्यांला स्वत:च्या दृष्टांताची आणि संदेशाची लाज वाटेल; आणि लोकांस फसवण्यासाठी ते केसांचा झगा घालणार नाहीत. तेव्हा तो म्हणेल, ‘मी संदेष्टा नाही! मी शेतकरी आहे; मी लहानपणापासून शेतीच करीत आलो आहे.’ पण इतर लोक त्यास विचारतील, ‘मग तुझ्या हातावर जखमा कसल्या?’ तेव्हा तो उत्तर देईल, ‘मित्राच्या घरात मला लागलेल्या माराचे हे वण होत!” सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे तलवारी, माझ्या मेंढपाळांवर प्रहार कर व माझ्या मित्रावर वार कर; मेंढपाळावर वार कर म्हणजे मेंढरे पळून जातील आणि मी त्या लहान जीवांना शिक्षा करीन. परमेश्वर म्हणतो, ते देशाचे दोन भाग नष्ट करतील आणि त्याचा तिसरा भाग मागे शेष राहील. त्या तिसऱ्या भागाला मी अग्नीत टाकीन, आणि चांदीला शुद्ध करताता तसे त्यांना शुद्ध करीन; सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘हे माझे लोक आहेत.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव आहे.’”

सामायिक करा
जखर्‍या 13 वाचा

जखर्‍या 13:2-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“त्या दिवशी, मी संपूर्ण देशातून मूर्तींच्या नावाचा समूळ उच्छेद करेन, ते त्यांच्या स्मरणातही राहणार नाही. सर्व खोट्या संदेष्ट्यांचा आणि अशुद्धतेच्या आत्म्याचा मी समूळ नाश करेन,” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. “आणि जर कोणी पुन्हा खोटे भविष्यकथन करू लागला, ज्यांनी त्याला जन्म दिला ते त्याचे खुद्द आईवडीलच त्याला सांगतील, ‘तू मेलाच पाहिजे, कारण तू याहवेहच्या नावाने खोटे बोलत आहेस.’ ते भविष्यकथन करणाऱ्यास भोसकून जिवे मारतील! “त्या दिवशी प्रत्येक खोटा संदेष्टा आपल्या भविष्यकथनाच्या दानाबद्दल लज्जित होईल. ते संदेष्ट्यांसाठी केसांनी बनविलेली विशिष्ट वस्त्रे घालणार नाहीत. प्रत्येकजण म्हणेल, ‘मी संदेष्टा नाही; मी एक शेतकरी आहे; तारुण्यापासून भूमीची मशागत करणे माझ्या उपजीविकेचे साधन आहे.’ त्याला कोणी विचारले, ‘तुझ्या छातीवर आणि पाठीवर हे घाव कशाचे आहेत?’ तेव्हा तो म्हणेल, ‘माझ्या मित्राच्या घरी या जखमा मला दिल्या आहेत!’ “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळाविरुद्ध जागी हो, माझ्या घनिष्ठ सोबत्याविरुद्ध ऊठ!” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरांची पांगापांग होईल, आणि मी माझा हात कोकरांविरुद्ध उगारेन.” याहवेह जाहीर करतात, “इस्राएलाच्या संपूर्ण राष्ट्रातील दोन तृतीयांश लोकांचा उच्छेद होईल व ते मरण पावतील, परंतु एकतृतीयांश लोक देशात उरतील. हा तिसरा भाग अग्नीत घालून चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. ते मला माझ्या नावाने हाक मारतील आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”

सामायिक करा
जखर्‍या 13 वाचा

जखर्‍या 13:2-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, त्या दिवशी असे होईल की, मी देशातून मूर्तींच्या नावांचा उच्छेद करीन, त्यांची ह्यापुढे आठवण होणार नाही आणि संदेष्टे व अशुद्ध आत्मा ह्यांना मी देशातून घालवून देईन. आणि असे होईल की कोणी संदेश वदू लागल्यास त्याचे जन्मदाते आईबाप त्याला म्हणतील, तू जिवंत राहायचा नाहीस, कारण तू परमेश्वराच्या नामाने लबाड्या सांगितल्या आहेत. तो संदेश वदू लागला तर त्याचे जन्मदाते आईबाप त्याला भोसकून मारतील. त्या दिवशी असे होईल की, संदेष्टा संदेश वदताना आपल्या प्रत्येक दृष्टान्तासंबंधाने लज्जित होईल व लोकांना फसवण्यासाठी केसांचा झगा घालणार नाही; पण तो म्हणेल, ‘मी काही संदेष्टा नाही, शेती करणारा मनुष्य आहे; कारण मला लहानपणीच कोणी दास केले.’ त्याला जर कोणी विचारले की, ‘तुझ्या बाहूंच्यामध्ये ह्या जखमा कसल्या?’ तर तो म्हणेल, ‘माझ्या इष्टमित्रांच्या घरी लागलेल्या घावांचे हे वण आहेत.”’ सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याच्यावर ऊठ; मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील; माझ्या लहानग्यांवर मी माझ्या हाताची छाया करीन.” परमेश्वर म्हणतो, “देशभर असे होईल की, त्याचे दोन भाग नष्ट करतील, पण त्याचा तिसरा भाग मागे राहील. तो तिसरा भाग मी अग्नीत टाकीन, रुपे गाळतात तसे मी त्यांना गाळीन, सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यांना शुद्ध करीन; ते माझे नाम घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन; मी म्हणेन, ‘हे माझे लोक’ व ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव.”’

सामायिक करा
जखर्‍या 13 वाचा