जखर्या 10:1-12
जखर्या 10:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
वीज उत्पन्न करणार्या परमेश्वराजवळ वळवाच्या पावसाच्या वेळी पाऊस मागा म्हणजे तो त्यांच्यावर वृष्टी करील; तो प्रत्येकाच्या शेतात गवत उपजवील, कारण तेराफीम3 व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटे दृष्टान्त पाहिले आहेत व फसवणारी स्वप्ने सांगितली आहेत; ते कोरडा धीर देतात; ह्यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांच्यावर जुलूम होत आहे. “मेंढपाळांवर माझा क्रोध भडकला आहे, बोकडांचे मी शासन करीन; कारण सेनाधीश परमेश्वराने आपला कळप जे यहूदाचे घराणे त्याची भेट घेतली आहे, तो त्यांना आपल्या लढाईच्या सजवलेल्या घोड्यासारखे करील. त्याच्यापासूनच कोनशिला, त्याच्यापासूनच खुंटी, त्याच्यापासूनच युद्धधनुष्य, त्याच्यापासूनच प्रत्येक अधिकारी निघतो. वाटेतला चिखल तुडवत युद्धाला निघालेल्या योद्ध्याप्रमाणे ते होतील; ते युद्ध करतील, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे; घोडेस्वार फजीत होतील. मी यहूदाच्या घराण्यास शक्ती पुरवीन, योसेफाच्या घराण्याची मुक्तता करीन, देशात त्यांची वस्ती करीन; कारण त्यांच्यावर मी करुणा केली आहे; मी त्यांचा त्याग केलाच नाही असे ते होतील; कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे, मी त्यांचे ऐकेन. एफ्राईम वीरासारखा होईल, द्राक्षारसाने होते तसे त्यांचे हृदय हर्षित होईल; त्यांची मुले हे पाहून उल्लास पावतील; त्यांचे हृदय परमेश्वराच्या ठायी आनंदेल. मी शीळ घालून त्यांना जमा करीन; कारण मी त्यांना सोडवून घेतले आहे; त्यांची पूर्वी वृद्धी झाली तशी ते वृद्धी पावतील. मी राष्ट्रांमध्ये त्यांची पेरणी करीन; दूर देशात ते माझे स्मरण करतील; ते आपल्या मुलांसहित जिवंत राहून माघारी येतील. मी त्यांना मिसर देशातून माघारी आणीन; अश्शूर देशातून त्यांना एकत्र करीन; गिलाद व लबानोन ह्यांच्या भूमीवर त्यांना आणीन; त्यांना जागा पुरायची नाही. तो संकटसमुद्रातून पार जाऊन समुद्रलहरींना दबकावील; नील नदीचे सर्व गहिरे पाणी सुकून जाईल. अश्शूराचा गर्व उतरेल, मिसरचे राजवेत्र निघून जाईल. मी त्यांना परमेश्वराच्या ठायी बलवान करीन; ते त्याच्या नामाने येतील-जातील,” असे परमेश्वर म्हणतो.
जखर्या 10:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वीज व वादळवारा निर्माण करणाऱ्या परमेश्वराकडे वळवाच्या पावसासाठी प्रार्थना करा आणि तो त्यांच्यासाठी पावसाची वृष्टी करील, मानव व जमिनीवरील पिकांसाठी तो ती करील. कारण तेराफिम मुर्तींनी निरर्थक गोष्टी केल्या आहेत, दैवज्ञांनी लबाडीचा दृष्टांत पाहिला आहे; ते आपली फसवणारी स्वप्ने सांगतात आणि खोटा धीर देतात; म्हणून लोक मेंढरांसारखे भटकत आहेत आणि त्यांचा कोणी मेंढपाळ नसल्याने त्यांच्यावर संकटे आली आहेत. परमेश्वर म्हणतो, “माझा राग मेंढपाळांवर पेटला आहे; त्यांच्यातील बोकडांना, पुढाऱ्यांना मी शासन करीन; कारण सेनाधीश परमेश्वर आपल्या कळपाची, यहूदाच्या घराण्याची, काळजी वाहील, आणि त्याच्या लढाईच्या घोड्यासारखे त्यांना बनवेल.” “त्यांच्यातूनच कोनशिला उत्पन्न होईल; त्यांच्यापासूनच खुंट्या तयार होतील; त्यांच्यातूनच युध्दात वापरावयाची धनुष्यही येईल; त्यांच्यातूनच प्रत्येक पुढारी निघेल. ते आपल्या शत्रूचा पराभव, जणू काही रस्त्यातून चिखल तुडवीत जावे, तसा तुडवीत करतील; परमेश्वर त्यांच्याबाजूला असल्याने ते लढाई करतील आणि घोडेस्वारांना अपमानीत करतील.” “मी यहूदाच्या घराण्याला बळकट करीन आणि योसेफाच्या घराचा बचाव करीन; कारण मी त्यांना पुनःस्थापित करीन आणि त्यांच्यावर दया करीन. आणि मी त्यांचा कधीच त्याग केला नव्हता, असेच त्यांच्याशी वागेन. मी परमेश्वर त्यांचा देव आहे व त्यांना प्रतिसाद देईल. एखाद्या योद्ध्याप्रमाणे एफ्राईम खूश होईल, त्यांचे हृदय द्राक्षरसाने हर्षित होते तसे हर्षित होईल; त्यांचे लोक हे पाहतील आणि ते आनंदीत होतील. परमेश्वराच्याठायी त्यांचे हृदय आनंदीत होईल.” “मी त्यांना शीळ वाजवून एकत्र बोलवीन कारण मी त्यांना वाचवीन आणि त्यांची संख्या पूर्वी होती तशीच असंख्य होईल. होय! मी माझ्या लोकांस राष्ट्रां-राष्ट्रांत पांगवीत आलो आहे, पण त्या दूरदूरच्या ठिकाणीही ते माझे स्मरण ठेवतील. ते आणि त्यांची मुलेबाळे जगतील, वाचतील आणि परत येतील. मी त्यांना मिसरमधून परत आणीन व अश्शूरमधून मी त्यांना गोळा करीन. मी त्यांना गिलादाच्या व लबानोनाच्या नगरात आणीन. ते त्या जागेत मावणार नाहीत तोपर्यंत मी त्यांना आणीन.” ते जाचजुलूमाच्या समुद्रातून जातील; ते गर्जनाऱ्या समुद्राला दबकावतील, ते नाईल नदीला सुकवतील व तिचे सर्व तळ उघडे पाडतील. तो अश्शूरचे गर्वहरण करील आणि मिसराच्या सत्तेचा राजदंड त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. मी त्यांना सामर्थ्यवान करीन, ते देवासाठी व त्याच्या नावासाठी चालतील, हे परमेश्वराचे वचन होय.
जखर्या 10:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“वसंतॠतूमध्ये पाऊस पडावा म्हणून याहवेहस विनंती करा; याहवेहच कडाडणाऱ्या मेघगर्जना पाठवितात. तेच सर्व लोकांवर पावसाचा वर्षाव करतात आणि प्रत्येकाला शेतातील पीक देतात. मूर्ती लबाड बोलतात, दैवप्रश्न करणारे खोटे दृष्टान्त बघतात; ते जी स्वप्ने सांगतात ती खरी नसतात, त्यांनी केलेले सांत्वन व्यर्थ असते. म्हणून लोक मेंढपाळ नसल्यामुळे जुलमाच्या दबावाखाली मेंढराप्रमाणे भटकतात. “माझा संताप मेंढपाळांविरुद्ध भडकतो, आणि मी पुढार्यांना शिक्षा करेन; कारण आपल्या कळपाची, यहूदीयाच्या लोकांची काळजी सर्वसमर्थ याहवेह करतील, आणि त्यांना युद्धातील कुशल घोड्यांप्रमाणे करतील. यहूदातून कोनशिला येईल, त्याच्यातूनच तंबूचा खिळा, त्याच्यातूनच युद्धाचे धनुष्य, त्याच्यातूनच प्रत्येक अधिकारी येईल. एकत्र ते योद्ध्यांसारखे होतील ते आपले शत्रू रस्त्यातील चिखलात तुडवतील. ते लढतील कारण याहवेह त्यांच्याबरोबर आहेत, आणि ते त्यांच्या शत्रूंच्या घोडेस्वारांना लज्जित करतील. “मी यहूदाहला बलवान करेन आणि योसेफाच्या वंशास वाचवेन. मी त्यांची पुनर्स्थापना करेन कारण मी त्यांच्यावर करुणा करतो. ते असे होतील, जणू काही मी त्यांचा त्याग कधी केलाच नव्हता, कारण मी त्यांचा याहवेह परमेश्वर आहे आणि मी त्यांचा धावा ऐकेन. एफ्राईमी योद्ध्यांसारखे होतील, द्राक्षारसाने व्हावे तसे त्यांचे हृदय आनंदित होईल. त्यांची मुलेसुद्धा हे पाहतील आणि उल्लास पावतील; त्यांची हृदये याहवेहच्या ठायी आनंदित होतील. मी त्यांना संकेत देईन, आणि त्यांना एकत्र करेन. मी निश्चितच त्यांना सोडवेन; ते पुन्हा पूर्वीसारखेच असंख्य होतील. जरी मी त्यांना लोकांमध्ये विखुरले आहे, तरी देखील त्या दूर देशी ते माझी आठवण करतील. ते व त्यांची सर्व मुलेबाळे जगतील, आणि ते परत येतील. मी त्यांना इजिप्तमधून परत आणेन, आणि अश्शूरातून एकत्र गोळा करेन. गिलआद व लबानोनमध्ये त्यांचे पुनर्वसन करेन, आणि तिथे त्यांना जागा पुरेशी होणार नाही. ते संकटांच्या समुद्रातून प्रवास करतील; उफाळणाऱ्या लाटा शांत केल्या जातील आणि नाईल नदीचे खोल पाणी शुष्क होईल. अश्शूरचा गर्व खाली करण्यात येईल व इजिप्तचा राजदंड निघून जाईल. मी याहवेहमध्ये त्यांना सामर्थ्यवान करेन आणि त्यांच्या नामामध्ये ते सुरक्षितपणे जगतील,” असे याहवेह जाहीर करतात.