YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गीतरत्न 2:8-14

गीतरत्न 2:8-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

(ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) मी माझ्या प्राणप्रियाचा आवाज ऐकत आहे. तो येत आहे, डोंगरावरुन उड्या मारत, टेकड्यांवरुन बागडत येत आहे. माझा प्रियकर मृगासारखा, हरीणीच्या पाडसासारखा आहे. आमच्या भिंतीच्या मागे उभा आहे, खिडकीतून डोकावणाऱ्या, झरोक्यातून पाहणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा. माझा प्रियकर माझ्याशी बोलला आणि म्हणाला, माझ्या प्रिये, ऊठ, माझ्या सुंदरी, ये आपण दूर जाऊ या! बघ आता हिवाळा संपला आहे. पाऊस आला आणि गेला. भूमीवर फुले दिसत आहेत, पक्ष्यांची गाण्याची वेळ आली आहे. आणि आमच्या देशात कबुतरांचा आवाज ऐकू येत आहे. अंजिराच्या झाडावरील हिरवे अंजीर पिकवीत आहे. आणि द्राक्षवेलीस फुले आली आहेत. ती सुगंध पसरीत आहे. अगे माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ आपण आता दूर जाऊ या. माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या खडकात लपलेल्या, पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुझे मुख पाहू दे. मला तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तुझा चेहरा खूप सुंदर आहे.

सामायिक करा
गीतरत्न 2 वाचा

गीतरत्न 2:8-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हा माझ्या वल्लभाचा शब्द! पाहा तो डोंगरावरून उड्या मारत, टेकड्यांवरून दौडत येत आहे! माझा वल्लभ हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा आहे; पाहा, तो आमच्या भिंतीमागे उभा आहे; तो खिडकीतून डोकावत आहे तो झरोक्यांतून पाहत आहे. माझा वल्लभ मला म्हणाला, “माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल. पाहा, हिवाळा गेला आहे; पाऊस संपून गेला आहे; पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत; पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे; आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकू येत आहे. अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत; द्राक्षीला फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे; माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल, ये. अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे; कारण तुझा कंठ मधुर आहे; तुझे मुख रम्य आहे.

सामायिक करा
गीतरत्न 2 वाचा