गीतरत्न 2:10-13
गीतरत्न 2:10-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझा वल्लभ मला म्हणाला, “माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल. पाहा, हिवाळा गेला आहे; पाऊस संपून गेला आहे; पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत; पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे; आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकू येत आहे. अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत; द्राक्षीला फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे; माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल, ये.
गीतरत्न 2:10-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझा प्रियकर माझ्याशी बोलला आणि म्हणाला, माझ्या प्रिये, ऊठ, माझ्या सुंदरी, ये आपण दूर जाऊ या! बघ आता हिवाळा संपला आहे. पाऊस आला आणि गेला. भूमीवर फुले दिसत आहेत, पक्ष्यांची गाण्याची वेळ आली आहे. आणि आमच्या देशात कबुतरांचा आवाज ऐकू येत आहे. अंजिराच्या झाडावरील हिरवे अंजीर पिकवीत आहे. आणि द्राक्षवेलीस फुले आली आहेत. ती सुगंध पसरीत आहे. अगे माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ आपण आता दूर जाऊ या.
गीतरत्न 2:10-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझा प्रियतम मला म्हणाला, “माझ्या प्रिये, ऊठ, माझ्या सुंदरी, माझ्याबरोबर ये. पाहा! हिवाळा संपला आहे; आता पाऊससुद्धा होऊन गेला. पृथ्वीवर फुले उमलली आहेत; गाण्याचा ऋतू आला आहे, कबुतरांचे गीत आमच्या देशात ऐकू येत आहे. अंजिराच्या झाडाची फळे लागली आहेत; आणि द्राक्षवेलींच्या फुलांचा सुगंध दरवळत आहे. ऊठ, ये, माझ्या प्रिये; माझ्या सुंदरी, माझ्याबरोबर ये.”