रूथ 1:14-16
रूथ 1:14-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तिच्या सुना मोठा आवाज काढून पुन्हा रडू लागल्या. अर्पाने आपल्या सासूचे चुंबन घेतले, पण रूथ तिच्या जवळ राहिली. ती तिला म्हणाली, “ऐक, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.” रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यापासून दूर जा असे मला सांगू नका; तुम्ही जिथे जाल तिथे मी येईन, तुम्ही जिथे रहाल तिथे मी राहीन आणि तुमचे लोक ते माझे लोक व तुमचा देव तो माझा देव.
रूथ 1:14-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग पुन्हा त्या गळा काढून रडू लागल्या; अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला; पण रूथ तिला बिलगून राहिली. तेव्हा ती म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.” रूथ म्हणाली, “मला सोडून जा आणि माझ्यामागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका; तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव