रोमकरांस पत्र 8:31-38
रोमकरांस पत्र 8:31-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण? आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही, पण आपल्या सर्वांसाठी त्यास दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टीही का देणार नाही? देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे. दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मरण पावला, हो, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’ पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्या गोष्टी किंवा बले
रोमकरांस पत्र 8:31-38 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अशा गोष्टींना प्रतिसाद म्हणून काय म्हणावे? जर परमेश्वर आपल्या पक्षाचे आहेत तर आमच्याविरुद्ध कोण असू शकेल? ज्यांनी स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता आपणा सर्वांकरिता त्यांना दिले, तर ते आपल्याला त्यांच्यासोबत सर्वकाही उदारतेने देणार नाहीत काय? परमेश्वराने ज्यांना निवडले आहे त्यांच्यावर आरोप करण्यास कोण धजेल? नीतिमान ठरविणारे ते परमेश्वरच आहेत. तर असा कोण आहे जो आपल्याला दंडाज्ञा देईल? कोणी नाही. ख्रिस्त येशू जे मरण पावले, इतकेच नव्हे तर जिवंत असे उठविले गेले आणि तेच आता परमेश्वराच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहेत. मग ख्रिस्ताच्या प्रीतिपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल? संकट किंवा आपत्ती किंवा छळ किंवा दुष्काळ किंवा नग्नता, धोका किंवा तरवार काय? कारण असे लिहिले आहे: “तुझ्यासाठी आम्ही दिवसभर मरणाला तोंड देतो, वधाची प्रतीक्षा करणार्या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे.” नाही, या सर्व गोष्टीत ज्यांनी आमच्यावर प्रीती केली, त्यांच्याद्वारे आम्ही अत्यंत विजयी आहोत. कारण माझी खात्री आहे की न मरण न जीवन, न देवदूत न भुते, न वर्तमान न भविष्यकाळ, न कोणती शक्ती
रोमकरांस पत्र 8:31-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्वकाही कसे देणार नाही? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे; कापायच्या मेंढरासारखे आम्हांला गणले आहे.” उलटपक्षी, ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले
रोमकरांस पत्र 8:31-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तर मग ह्या गोष्टींवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपणा सर्वांकरता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही देणार नाही काय? देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मरण पावला इतकेच नव्हे तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. तर मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? अडचणी, तणाव, दुष्काळ, छळ, दारिद्र्य, संकट किंवा तलवार ह्या गोष्टी विभक्त करतील काय? धर्मशास्त्रात लिहिल्याप्रमाणे: तुझ्यामुळे आम्ही नेहमीच मरणाच्या धोक्यात असतो. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हांला गणले जाते. उलटपक्षी, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्यायोगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो! कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, बले, वर्तमानकाळाच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी