रोमकरांस पत्र 8:3-4
रोमकरांस पत्र 8:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्यास जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापासाठी पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली. म्हणजे आपण जे देहाला अनुसरून नाही पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत त्या आपल्यात नियमशास्त्राची आज्ञा पूर्ण व्हावी.
रोमकरांस पत्र 8:3-4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण आपल्या पापी स्वभावामुळे आपल्याला वाचवण्यास नियम असमर्थ होते, तेव्हा परमेश्वराने स्वतःच्या पुत्राला पापमय मनुष्यासारखे व पापबली म्हणून पाठविले व मानवी स्वभावात जे पाप राज्य करीत होते त्याला दोषी ठरविले. यासाठी की जे देहाने नव्हे तर पवित्र आत्म्याप्रमाणे जीवन जगतात, त्यांच्यामध्ये नियमांसाठी आवश्यक असणारे नीतिमत्व पूर्ण व्हावे.
रोमकरांस पत्र 8:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण नियमशास्त्र देहस्वभावामुळे दुर्बळ झाल्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली; ह्यात उद्देश हा की, जे आपण देहस्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपल्यामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे.
रोमकरांस पत्र 8:3-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देहाच्या दुर्बलतेप्रमाणे नियमशास्त्र जे करू शकले नाही, ते देवाने केले. ह्यासाठी त्याने त्याचा पुत्र, पापमय देहासारख्या देहाने पाठवून, पाप दूर करण्यासाठी देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली. ह्यांत उद्देश हा की, जे आपण देहानुसार नव्हे तर पवित्र आत्म्यानुसार चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे.