रोमकरांस पत्र 8:1-3
रोमकरांस पत्र 8:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या पवित्र आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले. कारण देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्यास जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापासाठी पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.
रोमकरांस पत्र 8:1-3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, जे आता ख्रिस्त येशूंमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. कारण ख्रिस्त येशूंच्याद्वारे आत्म्याच्या नियमाने जे तुम्हाला जीवन देतात, त्यांनी तुम्हाला पापाचे नियम व मरण यातून मुक्त केले आहे. कारण आपल्या पापी स्वभावामुळे आपल्याला वाचवण्यास नियम असमर्थ होते, तेव्हा परमेश्वराने स्वतःच्या पुत्राला पापमय मनुष्यासारखे व पापबली म्हणून पाठविले व मानवी स्वभावात जे पाप राज्य करीत होते त्याला दोषी ठरविले.
रोमकरांस पत्र 8:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. [ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.] कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. कारण नियमशास्त्र देहस्वभावामुळे दुर्बळ झाल्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली
रोमकरांस पत्र 8:1-3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही. कारण ख्रिस्त येशूमध्ये जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. देहाच्या दुर्बलतेप्रमाणे नियमशास्त्र जे करू शकले नाही, ते देवाने केले. ह्यासाठी त्याने त्याचा पुत्र, पापमय देहासारख्या देहाने पाठवून, पाप दूर करण्यासाठी देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली.