YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 6:16-23

रोमकरांस पत्र 6:16-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तुम्ही ज्याला आपल्या स्वतःला दास म्हणून आज्ञा पाळण्यास समर्पण करता, तुम्ही ज्याच्या आज्ञा पाळता त्याचे तुम्ही दास आहात. ते मरणासाठी पापाचे किंवा नीतिमत्त्वासाठी आज्ञापालनाचे, हे तुम्ही जाणत नाही काय? पण देवाला धन्यवाद कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या. आणि पापापासून मुक्त केले जाऊन नीतिमत्त्वाचे दास झाला. मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्त्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा. कारण तुम्ही पापाचे दास होता, तेव्हा तुम्ही नीतिमत्त्वाच्या बाबतीत स्वतंत्र होता. आता तुम्हास ज्यांची लाज वाटते त्या गोष्टींपासून तेव्हा तुम्हास काय फळ मिळत होते? कारण त्या गोष्टींचा शेवट मरण आहे. पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हास पवित्रीकरण हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे.

रोमकरांस पत्र 6:16-23 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ज्याची आज्ञा पाळण्यासाठी तुम्ही स्वतःला वाहवून घेता, त्याची आज्ञा पाळण्याने तुम्ही त्याचे गुलाम बनता; पापाची गुलामी तर मरण, किंवा परमेश्वराचे आज्ञापालन तर नीतिमत्व हे तुम्हाला माहीत नाही काय? परमेश्वराचे आभारी आहोत, कारण पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता, परंतु आता तुम्हाला जी शिकवण दिली आहे तिचे तुम्ही अंतःकरणापासून आज्ञापालन केले आणि तुम्ही समर्पित आहात. तुम्ही पापापासून मुक्त होऊन आता नीतिमत्वाचे दास झाला आहात. तुमच्या मानवी रीतिप्रमाणे रोजच्या जीवनातील उदाहरण घेऊन मी बोलतो. तुम्ही आपले अवयव अशुद्धपणाला व सतत वाढणार्‍या दुष्टपणाला दास म्हणून समर्पित केले होते, तसे आता स्वतःस जे नीतिमत्व पावित्र्याकडे नेते त्यास दास म्हणून समर्पित करा. जेव्हा तुम्ही पापाचे दास होता, तेव्हा नीतिमत्वाच्या बंधनातून मुक्त होता. ज्यासाठी तुम्हाला आता लाज वाटते त्या गोष्टींपासून त्यावेळी तुम्हाला काय लाभ मिळाला? त्या गोष्टींचा परिणाम तर मरण आहे. पण आता तुम्ही पापाच्या सत्तेपासून मुक्त झाला असून परमेश्वराचे दास झाला आहात, आणि जो लाभ तुम्हाला मिळाला आहे तो पावित्र्याकडे नेतो व त्याचा परिणाम सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण परमेश्वराचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.

रोमकरांस पत्र 6:16-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हांला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले, आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाची स्तुती असो. तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे; कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरता अमंगळपण व स्वैराचार ह्यांस गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्त्वाला गुलाम असे समर्पण करा. तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्त्वासंबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे? त्यांचा शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हांला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.

रोमकरांस पत्र 6:16-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात,हे तुम्हांला ठाऊक नाही काय? ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे तुम्ही गुलाम आहात किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात? तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारची शिकवण तुम्ही स्वीकारली आहे, तिचे पालन तुम्ही मनापासून केले आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालात, म्हणून देवाला धन्यवाद! तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे. जसे तुम्ही आपले अवयव अमंगळपण व स्वैराचार करण्याकरिता वापरले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरता नीतिमत्वाला गुलाम म्हणून समर्पित करा. तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्वासंबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टींची तुम्हांला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त झाले? त्यांचा शेवट तर मरण आहे! परंतु आता तुम्ही पापांपासून मुक्त झाल्यामुळे तुम्ही देवाचे गुलाम आहात. ह्याचा फायदा म्हणजे तुम्ही पवित्र होता. त्याची परिणीती शाश्वत जीवनात होते. पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शाश्वत जीवन आहे.