रोमकरांस पत्र 5:6-11
रोमकरांस पत्र 5:6-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मरण पावला. कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील, पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो. मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. कारण आपण वैरी होतो, तेव्हा जर आपला देवाबरोबर, त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की, आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ. इतकेच नाही, पण आता ज्याच्या द्वारे आपण समेट स्वीकारला आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान मिरवतो.
रोमकरांस पत्र 5:6-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपण अगदी दुर्बळ होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी, अधर्मी लोकांसाठी मरण पावले. नीतिमान मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल; चांगल्या मनुष्यासाठी मरावयास कोणीतरी धजेल. परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतिचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले. त्यांच्या रक्ताने आपल्याला नीतिमान ठरविले, तर किती विशेषकरून परमेश्वराच्या सर्व भावी क्रोधापासून त्यांच्याद्वारे आपला बचाव होईल! आपण परमेश्वराचे वैरी असताना, त्यांच्या पुत्राच्या मरणाद्वारे आपला समेट झाला, त्याअर्थी समेट झाल्यानंतर, कितीतरी अधिक त्यांच्या जीवनाद्वारे तारले जाऊ! एवढेच नव्हे, तर परमेश्वरामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे अभिमान बाळगतो, त्यांच्याद्वारे आमचा आता समेट झाला आहे.
रोमकरांस पत्र 5:6-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील; परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत; इतकेच केवळ नाही, तर ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान बाळगतो.
रोमकरांस पत्र 5:6-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपण दुर्बल असतानाच योग्य वेळी अधार्मिकांसाठी ख्रिस्त मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाही ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण किती अधिक प्रमाणात त्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत!. आपण शत्रू असता देवाबरोवर त्याच्या पुत्राच्या मृत्युद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता, त्याच्या जीवनाने आपण किती अधिक प्रमाणात तारले जाणार आहोत!. इतकेच केवळ नव्हे, तर ज्याच्याद्वारे समेट ही देणगी आपणाला आता मिळाली आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण देवामध्ये अभिमान बाळगतो.