रोमकरांस पत्र 5:3-8
रोमकरांस पत्र 5:3-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि इतकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते, आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते. आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाची प्रीती ओतली जात आहे. कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मरण पावला. कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील, पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो.
रोमकरांस पत्र 5:3-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इतकेच केवळ नव्हे तर क्लेशातही आनंद करतो, कारण आपणास माहीत आहे की दुःख हे धीर उत्पन्न करते. धीरामुळे, चारित्र्य; आणि चारित्र्यामुळे, आशा. आशेमुळे आपण लज्जित होणार नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली गेली आहे. आपण अगदी दुर्बल होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी, अधर्मी लोकांसाठी मरण पावले. नीतिमान मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल; चांगल्या मनुष्यासाठी मरावयास कोणीतरी धजेल. परंतु परमेश्वर आम्हावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण असे देतात की, आम्ही पापी असताना, ख्रिस्त आम्हासाठी मरण पावले.
रोमकरांस पत्र 5:3-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते; आणि ‘आशा लाजवत नाही;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील; परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.
रोमकरांस पत्र 5:3-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
इतकेच नव्हे, तर संकटाचाही आपण अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. ही आशा आपली फजिती होऊ देत नाही कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आपण दुर्बल असतानाच योग्य वेळी अधार्मिकांसाठी ख्रिस्त मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाही ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.