रोमकरांस पत्र 5:20-21
रोमकरांस पत्र 5:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली. म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे प्राप्त होणार्या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे राज्य चालवावे.
रोमकरांस पत्र 5:20-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पापाची जाणीव वाढावी म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला, कारण जेथे पाप वाढले, तेथे कृपा अति विपुल झाली, यासाठी की ज्याप्रमाणे पापाने मरणाद्वारे राज्य केले, त्याचप्रमाणे कृपेने नीतिमत्वाद्वारे राज्य करावे आणि येशू ख्रिस्त आपल्या प्रभूच्याद्वारे सार्वकालिक जीवन मिळावे.
रोमकरांस पत्र 5:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला; तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली. अशासाठी की, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे राज्य करावे.
रोमकरांस पत्र 5:20-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नियमशास्त्राचा प्रवेश झाल्यामुळे परिणाम असा झाला की, अपराध वाढले. तरीही जेथे पाप वाढले, तेथे कृपा त्यापेक्षा अधिक वाढली. तर मग जसे पापाने मरणाच्या योगे राज्य केले तसे देवाची कृपा नीतिमत्त्वाच्यायोगे शाश्वत जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करते.