YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 5:16-18

रोमकरांस पत्र 5:16-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही; कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले. कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे, त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्त्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेषेकरून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते.

रोमकरांस पत्र 5:16-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि पाप करणार्‍या एकामुळे जसा परिणाम झाला, तशी देणगीची गोष्ट नाही; कारण एका अपराधामुळे दंडाज्ञेसाठी न्याय आला, पण अनेक अपराधांमुळे निर्दोषीकरणासाठी कृपादान आले. कारण मरणाने, एका अपराधामुळे, एकाच्या द्वारे राज्य केले, तर त्याहून अधिक हे आहे की, जे कृपेची व नीतिमत्त्वाच्या देणगीची विपुलता स्वीकारतात, ते त्या एकाच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. म्हणून जसे एकाच अपराधामुळे सर्व मनुष्यांना दंडाज्ञा ठरविण्यास कारण झाले, तसे एकाच निर्दोषीकरणामुळे सर्व मनुष्यांना जीवनासाठी नीतिमान ठरविण्यास कारण झाले.

रोमकरांस पत्र 5:16-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परमेश्वराचे वरदान एका मनुष्याने केलेल्या पापाच्या परिणामासारखे नाही आणि एकाच्या पापामुळे न्याय दंड मिळाला, परंतु वरदान अनेक अपराधानंतर आले आणि आपल्याला नीतिमान गणण्यात आले. कारण जर एका मनुष्याच्या अपराधामुळे, त्याच मनुष्याच्या द्वारे मरणाने राज्य केले, तर ज्यांना कृपेची व नीतिमत्वाची विपुल दाने मिळाली आहेत, ते येशू ख्रिस्त जे एक मानव आहेत, त्यांच्याद्वारे जीवनात किती विशेषकरून राज्य करतील! यास्तव एका अपराधामुळे सर्व मनुष्यजाती दंडास पात्र झाली, तसेच न्यायीपणाच्या एका कृत्यामुळे सर्व मनुष्यजात जीवनासाठी नीतिमान ठरविली जाते.

रोमकरांस पत्र 5:16-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही; कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले. कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे, त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्त्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेषेकरून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते.

रोमकरांस पत्र 5:16-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही, कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले. परंतु कृपादानामुळे सर्व निर्दोषी ठरवले जातात. जर त्या एकाच माणसाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेच्या व नीतिमत्त्वाच्या दानाची विपुलता स्वीकारतात, ते कितीतरी अधिक प्रमाणात येशू ख्रिस्त या एका माणसाद्वारे जीवनात राज्य करतील. तर मग जसे एका अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे एका माणसाच्या नीतिमत्त्वाच्या कृत्यामुळे सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते.