रोमकरांस पत्र 5:1-4
रोमकरांस पत्र 5:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण उभे आहोत त्या कृपेतही त्याच्याद्वारे विश्वासाने आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो. आणि इतकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते, आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते.
रोमकरांस पत्र 5:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्याअर्थी, विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरविण्यात आले आहे, त्याअर्थी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराबरोबर शांती आहे, ख्रिस्ताद्वारे विश्वासामुळेच त्यांनी आपल्याला या कृपेत प्रवेश दिला आहे. येथे आपण स्थिर आहोत व आपण परमेश्वराच्या आशेच्या गौरवाची प्रौढी मिरवितो. इतकेच केवळ नव्हे तर क्लेशातही आनंद करतो, कारण आपणास माहीत आहे की दुःख हे धीर उत्पन्न करते. धीरामुळे, चारित्र्य; आणि चारित्र्यामुळे, आशा.
रोमकरांस पत्र 5:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत, तिच्यात आपला प्रवेशही त्याच्या द्वारे विश्वासाने झाला आहे; आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते
रोमकरांस पत्र 5:1-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर शांती मिळालेली आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्या कृपेत आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या वैभवात सहभागी होण्याची आशा बाळगतो. इतकेच नव्हे, तर संकटाचाही आपण अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते.