YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांस पत्र 4:16-24 - Compare All Versions

रोमकरांस पत्र 4:16-24 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि म्हणून हे वचन विश्वासाद्वारे म्हणजे कृपेने दिलेले आहे; ते ह्यासाठी की, नियमशास्त्रामुळे जे आहेत त्यांनाच ते असावे असे नाही. पण अब्राहामाच्या विश्वासामुळे जे आहेत त्यांनाही, म्हणजे सर्व संतानाला ते खात्रीने असावे. तो आपल्या सर्वांचा पिता आहे. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.’ ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मरण पावलेल्यांना जिवंत करतो आणि अस्तित्वात नसलेल्यांना ते असल्याप्रमाणे बोलावतो त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे. ‘तसे तुझे संतान होईल’ या वचनाप्रमाणे त्याने अनेक राष्ट्रांचा पिता व्हावे अशी आशा नसता, त्याने आशेने विश्वास ठेवला. आणि विश्वासात दुर्बळ नसल्यामुळे, तो सुमारे शंभर वर्षांचा असता त्याने आपल्या निर्जीव शरीराकडे व सारेच्या उदराच्या वांझपणाकडे लक्ष दिले नाही. त्याने देवाच्या वचनाविषयी अविश्वासाने संशय धरला नाही; तो विश्वासात स्थिर असल्यामुळे देवाला गौरव देत होता. आणि त्याची पूर्ण खात्री झाली की, देव आपले अभिवचन पूर्ण करण्यासही तो समर्थ आहे. आणि म्हणून ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणले गेले. आता ते त्याच्या हिशोबी गणले गेले, हे केवळ त्याच्याकरता लिहिले गेले नाही. पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ज्याने मरण पावलेल्यातून उठवले त्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर तो ते आपल्याही हिशोबी गणले जाणार आहे.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 IRVMAR

रोमकरांस पत्र 4:16-24 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

यास्तव, अभिवचन विश्वासाच्याद्वारे कृपा म्हणून अब्राहामाच्या सर्व वंशजाला मिळते. जे केवळ नियमांच्या अधीन आहेत त्यांनाच नव्हे, तर ज्यांचा विश्वास अब्राहामाच्या विश्वासासारखा आहे त्या सर्वांना, कारण अब्राहाम आपल्या सर्वांचा पिता आहे. असे लिहिले आहे: “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले.” परमेश्वराच्या दृष्टीने अब्राहाम आमचा पिता आहे, ज्यावर त्याने विश्वास ठेवला, जो परमेश्वर मेलेल्यांना जीवन देतो आणि ज्यागोष्टी नाही त्या गोष्टी अस्तित्वात याव्या अशी आज्ञा देतो. आशा धरण्यास काही आधार नसताना, अब्राहामाने आशेने विश्वास ठेवला व तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला, आणि “तुझी संततीही होईल.” असे त्याला सांगण्यात आले होते त्याचप्रमाणे झाले. त्याचे शरीर जणू काही मृत अवस्थेत असताना—तो अंदाजे शंभर वर्षाचा होता—व साराहचे गर्भाशय मृत झालेले असताना, त्याने आपला विश्वास डळमळू दिला नाही परमेश्वराच्या अभिवचनाबद्दल अब्राहाम कधीही अविश्वासाने डळमळला नाही, परंतु विश्वासामध्ये दृढ झाला आणि त्याने परमेश्वराला गौरव दिले. अभिवचन दिल्याप्रमाणे परमेश्वर करावयास समर्थ आहे ही त्याची पूर्ण खात्री होती. त्यामुळेच, “ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.” हे शब्द “तो नीतिमान ठरविला गेला” केवळ त्यांच्यासाठीच लिहिले गेले नव्हते, परंतु आपल्यासाठीही आहे, ज्यांनी प्रभू येशूंना मरणातून उठविले त्यावर विश्वास ठेवला तर परमेश्वर आपल्यालाही नीतिमान ठरवेल.

सामायिक करा
रोमकरांस पत्र 4 MRCV

रोमकरांस पत्र 4:16-24 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ह्या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे म्हणून ते विश्वासाने आहे; अशासाठी की, ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा पिता जो अब्राहाम त्याचा जो विश्वास होता, त्याला अनुसरून जे चालतात, त्यांनाही निश्‍चित व्हावे. “मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे” असे अब्राहामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे — त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. “तशी तुझी संतती होईल,” ह्या वचनाप्रमाणे त्याने ‘बहुत राष्ट्रांचा बाप’ व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता, आपले निर्जीव झालेले शरीर (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली; परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचा गौरव केला; आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती. म्हणूनच “ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले.” ‘ते त्याच्याकडे गणण्यात आले,’ हे केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यांमधून उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणार्‍या आपणांसाठीही ते लिहिलेले आहे, त्या आपणांलाही ते गणले जाणार आहे.

रोमकरांस पत्र 4:16-24 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ह्या कारणामुळे ते अभिवचन कृपेवर आधारित असावे म्हणून ते श्रद्धेवर अवलंबून असते. अशासाठी की, ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहाम ह्याचा जो विश्वास होता, त्याच्या श्रद्धेत जे सहभागी होतात, त्यांनाही उपलब्ध व्हावे. ‘मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे’, असे अब्राहामविषयी धर्मशास्त्रात जे लिहिलेले आहे, त्याप्रमाणे तो देवासमक्ष आपल्या सर्वांचा बाप आहे. त्याने जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला आज्ञा करून अस्तित्वात आणतो, अशा देवावर विश्वास ठेवला. ‘आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती होईल’, ह्या धर्मशास्त्रवचनाप्रमाणे त्याने पुष्कळ राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही विश्वास ठेवला. आपल्या शरीराची वयोवृद्ध अवस्था (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाची अक्षमता ह्या गोष्टी लक्षात घेऊनही तो विश्वासात दुर्बल झाला नाही. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने दृढ होऊन त्याने देवाचा गौरव केला. देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे, अशी त्याची पक्की धारणा होती. म्हणूनच ‘ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.’ ‘ते त्याच्याकडे नीतिमत्व असे गणण्यात आले’, हे विधान केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यांमधून उठविले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीदेखील ते लिहिलेले आहे, त्या आपणासाठीसुद्धा ते नीतिमत्व म्हणून गणले जाणार आहे.