रोमकरांस पत्र 13:7-8
रोमकरांस पत्र 13:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, ह्याशिवाय कोणाचे देणेकरी असू नका कारण जो दुसर्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे.
रोमकरांस पत्र 13:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रत्येकाला त्याचे जे काही देणे असेल, ते द्या: जर कर द्यायचे तिथे कर द्या, महसूल असेल तर महसूल द्या. आणि जिथे सन्मान तिथे सन्मान, जिथे आदर तिथे आदर द्या. इतरांवर प्रीती करण्याशिवाय कोणाचे ॠणी राहू नका, कारण जो कोणी दुसर्यांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे.
रोमकरांस पत्र 13:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या; ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या; ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा. एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका; कारण जो दुसर्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे.
रोमकरांस पत्र 13:7-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या, ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या, ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या, ज्याचा आदर राखायचा त्याचा आदर राखा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा. एकमेकांवर प्रीती करणे ह्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. जो दुसऱ्यांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे.