YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 8:1-5

प्रकटी 8:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याने सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले. तेव्हा देवासमोर उभे राहिलेले सात देवदूत मी पाहिले. त्यांना सात कर्णे देण्यात आले. मग आणखी एक देवदूत येऊन ‘वेदीपुढे उभा राहिला’ त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या ‘प्रार्थनांसह धूप’ ठेवण्याकरता त्याच्याजवळ पुष्कळ ‘धूप’ दिला होता. देवदूताच्या हातातून ‘धूपाचा’ धूर पवित्र जनांच्या ‘प्रार्थनांसह’ देवासमोर वर चढला. तेव्हा देवदूताने ‘धुपाटणे’ घेऊन त्यात ‘वेदीवरचा अग्नी भरून’ पृथ्वीवर टाकला आणि ‘मेघांचा गडगडाट व गर्जना’ झाल्या, ‘विजा’ चमकल्या व भूमिकंप झाला.

सामायिक करा
प्रकटी 8 वाचा

प्रकटी 8:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जेव्हा कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला, तेव्हा सुमारे अर्ध्या तासापर्यंत स्वर्गात शांतता होती. नंतर देवासमोर सात देवदूत उभे राहिलेले मी पाहिले आणि त्यांना सात कर्णे देण्यात आले. दुसरा एक देवदूत येऊन, वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्रजनांच्या प्रार्थनांसह धुप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. देवदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्रजनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला. तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यामध्ये वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूमिकंप झाला.

सामायिक करा
प्रकटी 8 वाचा

प्रकटी 8:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्यांनी जेव्हा सातवा शिक्का उघडला, तेव्हा स्वर्गामध्ये अंदाजे अर्धातास सर्वत्र संपूर्ण शांतता पसरली. नंतर मी पाहिले जे सात देवदूत परमेश्वरासमोर उभे राहिले, त्यांना सात कर्णे देण्यात आले. नंतर दुसरा एक देवदूत, सोन्याची एक धूपदाणी घेऊन आला व वेदीजवळ उभा राहिला. त्याला राजासनासमोरील सोन्याच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांच्या प्रार्थना मिश्रित बराच धूप देण्यात आला होता. त्या देवदूताच्या हातातून प्रार्थना मिश्रित धूपाचा सुगंध परमेश्वरासमोर वर चढला. तेव्हा त्या देवदूताने वेदीवरील अग्नी धूपदाणीत भरून घेतला आणि त्याने खाली पृथ्वीवर टाकला. त्याबरोबर मोठा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या आणि प्रचंड भूमिकंप झाला.

सामायिक करा
प्रकटी 8 वाचा

प्रकटी 8:1-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

कोकराने सातवा शिक्का फोडल्यावर स्वर्गात सुमारे अर्धा तासपर्यंत निवांत झाले. तेव्हा देवासमोर उभे राहिलेले सात देवदूत मी पाहिले. त्यांना सात कर्णे देण्यात आले होते. आणखी एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धूपपात्र होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह धुपारती करण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. देवदूताच्या हातातून धुपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनेसह देवासमोर वर चढला. तेव्हा देवदूताने धूपपात्र घेऊन त्यात वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला. मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूकंप झाला.

सामायिक करा
प्रकटी 8 वाचा