प्रकटी 7:11-12
प्रकटी 7:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा राजासन व वडील आणि चार जिवंत प्राणी यांच्यासभोवती सर्व देवदूत उभे होते आणि ते राजासनासमोर पालथे पडून देवाला नमन करीत म्हणाले, आमेन; स्तुती, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत; आमेन.
प्रकटी 7:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा सर्व देवदूत राजासन व वडीलजन आणि चार सजीव प्राणी यांच्याभोवती उभे होते आणि राजासनासमोर दंडवत घालून उपासना करीत असताना ते म्हणाले: “आमेन! आमच्या परमेश्वराला धन्यवाद, गौरव, सुज्ञता, उपकारस्तुती, मान, सामर्थ्य आणि पराक्रम सदासर्वकाळ असो. आमेन!”
प्रकटी 7:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा राजासन, वडीलमंडळ व चार प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते, ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले : “आमेन; धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ हे युगानुयुग आमच्या देवाचे आहेत! आमेन.”
प्रकटी 7:11-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेव्हा राजासन, वडीलजन व चार प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर लोटांगण घालून देवाची आराधना करीत म्हणाले, “आमेन! धन्यवाद, गौरव, सुज्ञता, आभारप्रदर्शन, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुगे आमच्या देवाची आहेत, आमेन!”