प्रकटी 6:1-6
प्रकटी 6:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग कोकर्याने त्या सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले, तेव्हा चार प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या ध्वनीने, “ये,”2 असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक ‘पांढरा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुकुट देण्यात आला; तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला. त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले. तेव्हा दुसरा ‘घोडा’ निघाला; तो ‘अग्निवर्ण’ होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते; त्याला मोठी तलवार देण्यात आली होती. त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक ‘काळा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला कोणीएक माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या हातात तराजू होते; आणि जणू काय चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी : “रुपयाला शेरभर गहू, आणि रुपयाला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस ह्यांची हानी करू नकोस!”
प्रकटी 6:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग कोकऱ्याने सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले आणि त्या चार प्राण्यातील एकाने मेघगर्जनेसारख्या वाणीने ये असे म्हणताना ऐकले. मी एक पांढरा घोडा पाहिला, त्यावर जो बसला होता त्याच्याजवळ धनुष्य होते आणि त्यास मुकुट देण्यात आला. तो जिंकीत विजयावर विजय मिळविण्यास निघाला. जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा दुसऱ्या जिवंत प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले. नंतर दुसरा घोडा निघाला, तो अग्निज्वालेप्रमाणे लाल होता. त्यावर जो बसलेला होता त्यास पृथ्वीवरील शांती नाहीशी करण्याचा अधिकार दिला होता. यासाठी की, लोकांनी एकमेकास वधावे. त्यास मोठी तलवार देण्यात आली होती. जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला, तिसऱ्या जिवंत प्राण्याला “ये” असे म्हणतांना ऐकले तेव्हा मी काळा घोडा पाहिला आणि त्यावर जो बसलेला होता त्याच्या हातात तराजू होते. मी चार प्राण्यांच्यामधून निघालेली वाणी ऐकली, ती म्हणत होती, एका चांदीच्या नाण्याला शेरभर गहू आणि एका चांदीच्या नाण्याला तीन शेर जव. परंतु तेल व द्राक्षरस यांची हानी करू नकोस.
प्रकटी 6:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कोकर्याने त्या सात शिक्यातील पहिला शिक्का फोडून उघडताना मी पाहिले. तेव्हा त्या चार सजीव प्राण्यांतील एकाने, गर्जनेसारख्या आवाजात म्हटले, “ये!” मी पहिले तो माझ्यासमोर एक पांढरा घोडा आहे असे मला दिसले! घोडेस्वाराजवळ एक धनुष्य होते. त्याच्या डोक्यावर एक मुकुट ठेवण्यात आला. मग विजेता म्हणून जिंकण्याच्या उद्देशाने तो स्वार निघून गेला. नंतर कोकर्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसर्या सजीव प्राण्याने, “ये” अशी हाक मारली, ती मी ऐकली. यावेळी एक अग्निवर्ण घोडा बाहेर पडला. पृथ्वीवरील शांतता नष्ट करण्याचा अधिकार त्याला देण्यात आला होता. लोक एकमेकांचा वध करू लागले. त्या स्वाराला एक मोठी तलवार देण्यात आली. मग कोकर्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा सजीव प्राणी, “ये” म्हणताना मी ऐकले. मग मी एक काळा घोडा पाहिला! त्याच्या स्वाराच्या हातात एक तराजू होते. मग त्या चार सजीव प्राण्यांमधून निघालेली एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “एका दिवसाच्या मजुरीत एक कि.ग्रॅ. गहू आणि तीन कि.ग्रॅ. जव! आणि तेल आणि द्राक्षारस यांची नासाडी करू नका.”
प्रकटी 6:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग कोकर्याने त्या सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले, तेव्हा चार प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या ध्वनीने, “ये,”2 असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक ‘पांढरा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला; त्याच्याजवळ धनुष्य होते, मग त्याला मुकुट देण्यात आला; तो विजय मिळवत मिळवत आणखी विजयावर विजय मिळवण्यास निघून गेला. त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले. तेव्हा दुसरा ‘घोडा’ निघाला; तो ‘अग्निवर्ण’ होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते; त्याला मोठी तलवार देण्यात आली होती. त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक ‘काळा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला कोणीएक माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या हातात तराजू होते; आणि जणू काय चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी : “रुपयाला शेरभर गहू, आणि रुपयाला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस ह्यांची हानी करू नकोस!”
प्रकटी 6:1-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यानंतर कोकराने त्या सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला, ते मी पाहिले. तेव्हा चार प्राण्यांपैकी एक मेघगर्जनेसारख्या ध्वनीने, “ये!” असे म्हणाला, ते मी ऐकले. मी पाहिले तो एक पांढरा घोडा आणि त्याच्यावर बसलेला स्वार माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते. त्यानंतर त्याला मुकुट देण्यात आला. तो विजयी योद्धा म्हणून विजयावर विजय मिळवण्यास निघाला. नंतर त्याने दुसरा शिक्का फोडला, तेव्हा दुसऱ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले. त्या वेळी दुसरा घोडा निघाला. तो तांबूस रंगाचा होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवर युद्ध करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याचे काम सोपविले होते. त्याला महान तलवार देण्यात आली होती. मग त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसऱ्या प्राण्याने, “ये”, अशी हाक मारली, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो काळा घोडा आणि त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते. त्या वेळी जणू काही चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी: “दिवसाची मजुरी किलोभर गहू आणि दिवसाची मजुरी तीन किलो जव. मात्र ऑलिव्ह तेल व द्राक्षरस ह्यांची नासाडी करू नकोस.”