प्रकटी 5:13-14
प्रकटी 5:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रत्येक निर्माण केलेली वस्तू आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, “जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुगापर्यंत असो!” चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्यास अभिवादन केले.
प्रकटी 5:13-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग स्वर्गातील, पृथ्वीवरील, पृथ्वीच्या खालील व समुद्रातील प्राण्यांना गाताना मी ऐकले. ते गात होते: “जे राजासनावर बसले आहेत, त्यांना व कोकर्याला उपकारस्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुग असो!” तेव्हा ते चार सजीव प्राणी म्हणाले, “आमेन,” आणि त्या चोवीस वडीलजनांनी साष्टांग नमस्कार घालून आराधना केली.
प्रकटी 5:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो, आणि त्यांतील सर्व वस्तुजात ह्यांना मी असे म्हणताना ऐकले : “राजासनावर बसलेला ह्याला व कोकर्याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत!” तेव्हा ते चार प्राणी म्हणाले, “आमेन!” आणि चोवीस वडिलांनी [जो सदासर्वकाळ जिवंत आहे त्याला] पाया पडून नमन केले.
प्रकटी 5:13-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रामध्ये जो प्रत्येक सृष्ट प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात ह्यांना मी असे गाताना ऐकले, “राजासनावर बसलेल्याला व कोकराला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम युगानुयुगे असो!” तेव्हा ते चार प्राणी म्हणाले, “आमेन!” आणि वडीलजनांनी लोटांगण घालून आराधना केली.