प्रकटी 22:12-17
प्रकटी 22:12-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“पाहा, मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे, मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य आहेत. परंतु कुत्रे, चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तीपूजा करणारे आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीची आवड धरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.” “तुमच्या आपापल्या मंडळ्यांसाठी याबाबतीत साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी, येशूने पाठविलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे.” आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये,” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये,” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.
प्रकटी 22:12-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“पाहा, मी लवकर येत आहे! माझे प्रतिफळ मी बरोबर घेऊन येत आहे. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार देईन. अल्फा व ओमेगा, म्हणजे पहिला व शेवटला, आदि व अंत मीच आहे. “आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य. नगराच्या बाहेर कुत्रे व जादूटोणा करणारे, जारकर्मी, खुनी, मूर्तिपूजक, ज्यांना लबाडी प्रिय आहे असे लबाडी करणारे सर्वजण राहतील. “तू हे सर्व मंडळ्यांना सांगावे म्हणून मी, येशूंनी, माझा दूत तुझ्याकडे साक्षीदार म्हणून पाठविला आहे. मी दावीदाचे मूळ व त्याचा वंश आहे. मी पहाटेचा तेजस्वी तारा आहे.” आत्मा व वधू ही म्हणतात “ये!” हा शब्द ऐकणारा प्रत्येकजण म्हणो, “ये!” कोणाही तान्हेल्याने यावे आणि कसलेही मोल न देता जीवनाचे पाणी हवे तेवढे प्यावे.
प्रकटी 22:12-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“‘पाहा, मी’ लवकर1 ‘येतो;’ आणि प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे.’ ‘मी’ अल्फा व ओमेगा म्हणजे ‘पहिला व शेवटला,’ आदी व अंत असा आहे. आपल्याला ‘जीवनाच्या झाडावर’ अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले ‘झगे धुतात’2 ते धन्य. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. ह्या गोष्टींविषयी तुम्हांला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळ्यांकरता पाठवले आहे. मी दाविदाचा ‘अंकुर’ आहे व त्याचे संतानही; मी पहाटचा तेजस्वी तारा आहे.” आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.
प्रकटी 22:12-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू म्हणतो, “ऐका! मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास मी वेतन घेऊन येईन. मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटचा, आदी व अंत आहे.” आपल्याला जीवनाच्या झाडावरील फळ खाण्याचा अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपले झगे स्वच्छ धुतात ते धन्य! विकृत जन, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, शब्दाने व कृतीने लबाडी करणारे सर्व लोक ह्या नगरीच्या बाहेर राहतील. तुमच्यासाठी ह्या गोष्टींविषयी घोषणा करण्याकरिता मी स्वतः येशूने माझ्या दूताला ख्रिस्तमंडळ्यांकडे पाठवले आहे. मी दावीदच्या घराण्याचे मूळ व वंशज आहे. मी तेजस्वी प्रभाततारा आहे. पवित्र आत्मा व वधू हेही म्हणतात, “ये.” हे ऐकणारा प्रत्येक जणदेखील म्हणो, “ये” आणि जो तहानलेला आहे व ज्याला हवे आहे त्याने यावे व जीवनाचे पाणी दान म्हणून स्वीकारावे.