YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 21:9-11 - Compare All Versions

प्रकटी 21:9-11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग ज्या सात देवदूतांनी त्या सात शेवटल्या पीडांनी भरलेल्या, सात वाट्या घेतल्या होत्या त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला, “इकडे ये, मी तुला वधू, कोकऱ्याची नवरी दाखवतो.” तेव्हा त्याने मला आत्म्याने एका मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि त्याने मला ती पवित्र नगरी यरूशलेम देवाकडून स्वर्गातून खाली उतरतांना दाखवली. यरूशलेमेच्या ठायी देवाचे तेज होते; आणि तिचे तेज अतिमोलवान खड्यासारखे; स्फटिकाप्रमाणे चमकणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते.

सामायिक करा
प्रकटी 21 IRVMAR

प्रकटी 21:9-11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मग शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या वाट्या ओतणार्‍या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे येऊन मला म्हणाला, “चल, माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला वधू—कोकर्‍याची पत्नी दाखवितो.” तेव्हा मी आत्म्याने संचारित झालो आणि मला एका उंच व विशाल अशा पर्वतशिखरावर नेण्यात आले. तिथून मी ती पवित्र नगरी म्हणजे यरुशलेम, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरतांना पाहिली. ती परमेश्वराच्या गौरवाने भरली होती, एखाद्या रत्नाप्रमाणे चमकत होती; यास्फे खड्यासारखी स्फटीकशुभ्र होती.

सामायिक करा
प्रकटी 21 MRCV

प्रकटी 21:9-11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नंतर शेवटल्या ‘सात पीडांनी’ भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा सात देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला; तो म्हणाला, “ये, नवरी म्हणजे कोकर्‍याची स्त्री मी तुला दाखवतो.” तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने ‘मला’ मोठ्या ‘उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम’ देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. तिच्या ठायी ‘देवाचे तेज’ होते; तिची कांती अति मोलवान रत्नासारखी होती; ती स्फटिकाप्रमाणे लखलखणार्‍या यास्फे खड्यासारखी होती

सामायिक करा
प्रकटी 21 MARVBSI

प्रकटी 21:9-11 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

नंतर शेवटच्या सात पीडांनी भरलेल्या सात वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा सात देवदूतांपैकी एक देवदूत आला व म्हणाला, “ये, वधू म्हणजे कोकराची पत्नी मी तुला दाखवतो.” तेव्हा मी आत्म्याने प्रभावित झालो. त्याने मला अतिशय उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखवली. ती दिव्य तेजाने चकाकत होती. ती अत्यंत मौल्यवान रत्नासारखी दिसत होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या सूर्यकांत खड्यासारखी वाटत होती.

सामायिक करा
प्रकटी 21 MACLBSI