YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 21:4-7

प्रकटी 21:4-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल; आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; दुःख, आक्रोश, किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.” तेव्हा राजासनावर बसलेला म्हणालाः “पाहा, मी सर्वकाही नवीन करतो आणि तो मला म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत.” आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.

सामायिक करा
प्रकटी 21 वाचा

प्रकटी 21:4-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

‘ते त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकतील आणि आता मृत्यू,’ दुःख, रडणे व वेदना अस्तित्वात राहणार नाहीत. या सर्व जुन्या गोष्टी कायमची नाहीशी झाली आहेत.” जे राजासनावर बसले होते ते म्हणाले, “मी सर्वकाही नवीन करीत आहे!” मग ते म्हणाले, “हे लिहून घे; कारण ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहेत.” ते मला म्हणाले, “सर्वकाही पूर्ण झाले आहे! मी अल्फा व ओमेगा, म्हणजे मीच प्रारंभ आणि शेवट आहे. तान्हेल्या सर्व लोकांना मी जीवनाच्या झर्‍याचे पाणी मोफत देईन. जो विजय मिळवितो त्यास या सर्व गोष्टींचा वारसा मिळेल. मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझी संतती होतील.

सामायिक करा
प्रकटी 21 वाचा

प्रकटी 21:4-7

प्रकटी 21:4-7 MARVBSIप्रकटी 21:4-7 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा