YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 21:1-4

प्रकटी 21:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता. आणि मी ती पवित्र नगरी, नवे यरूशलेम, देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून सजविलेल्या वधूप्रमाणे दिसत होती; आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल; आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; दुःख, आक्रोश, किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.”

सामायिक करा
प्रकटी 21 वाचा

प्रकटी 21:1-4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर मी, “एक नवी पृथ्वी व एक नवे आकाश” पाहिले, कारण पहिला आकाश व पहिल्या पृथ्वीचे अस्तित्व राहिले नसून त्यात समुद्र नव्हते. तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजे पवित्र नगरी, स्वर्गातून परमेश्वरापासून उतरताना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती. राजासनावरून मला एक मोठी वाणी ऐकू आली. ती म्हणाली, “पाहा! परमेश्वराचे वस्तीस्थान आता मनुष्यांबरोबर आहे; ते स्वतः त्यांच्याबरोबर राहतील; ते त्यांचे लोक होतील; आणि ते त्यांचे परमेश्वर होतील. ‘ते त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकतील आणि आता मृत्यू,’ दुःख, रडणे व वेदना अस्तित्वात राहणार नाहीत. या सर्व जुन्या गोष्टी कायमची नाहीशी झाली आहेत.”

सामायिक करा
प्रकटी 21 वाचा

प्रकटी 21:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर मी ‘नवे आकाश व नवी पृथ्वी’ ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी ‘पवित्र नगरी, नवी यरुशलेम’, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवर्‍यासाठी ‘शृंगारलेल्या नवरीप्रमाणे’ सजवलेली होती. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “‘पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः ‘त्याच्याबरोबर राहील.’ ‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.”

सामायिक करा
प्रकटी 21 वाचा

प्रकटी 21:1-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी नवे यरुशलेम म्हणजेच पवित्र नगरी, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली, ती वरासाठी शृंगारलेल्या वधूप्रमाणे सजविलेली होती. मी राजासनाकडून आलेली उच्च वाणी ऐकली. ती अशी: “पाहा, आता देवाचा मंडप मनुष्यांमध्ये आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील, तो त्यांचा देव होईल. तो त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकील. ह्यापुढे मरण नसेल. शोक, रडणे व वेदनाही नसेल. कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.”

सामायिक करा
प्रकटी 21 वाचा