प्रकटी 19:12-13
प्रकटी 19:12-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते; ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही. त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे
प्रकटी 19:12-13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याचे डोळे अग्निच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले होते ते त्याच्यावाचून कोणाला कळत नाही. त्याने रक्तात बुचकळलेली वस्त्रे पांघरलेली होती. “परमेश्वराचा शब्द” हे त्याचे नाव होते.
प्रकटी 19:12-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘त्याचे डोळे अग्नीच्या’ ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते; त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे; ते त्याच्यावाचून कुणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते; आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते
प्रकटी 19:12-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ रत्नजडित मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले होते. ते त्याच्यावाचून कोणाला कळत नाही. रक्तात बुडवून काढलेला झगा त्याने अंगावर घातला होता. ‘देवाचा शब्द’ हे त्याचे नाव होते.