YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 19:1-9

प्रकटी 19:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

या गोष्टींनंतर मी जणू एक, विशाल समुदायाची मोठी वाणी स्वर्गात ऐकली; ती म्हणाली हालेलूया, तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचीच आहेत, कारण त्याचे न्याय खरे आणि नीतीचे आहेत; कारण ज्या महावेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा त्याने न्यायनिवाडा केला आहे. आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. आणि ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलूया तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. तेव्हा ते चोवीस वडील व चार जिवंत प्राणी पालथे पडले, त्यांनी राजासनावर बसलेल्या देवाला नमन केले आणि ते म्हणालेः आमेन; हालेलूया. आणि राजासनाकडून एक वाणी आली; ती म्हणालीः तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहानमोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिणारे, आपल्या देवाची स्तुती करा. आणि, मी जणू एका, विशाल समुदायाची वाणी, ऐकली; ती वाणी महापूराच्या आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटांच्या आवाजासारखी होती. ती म्हणाली, हालेलूया; कारण, आमचा प्रभू सर्वसत्ताधारी देव हा राज्य करीत आहे. या, आपण आनंद करू, हर्ष करू, आणि त्यास गौरव देऊ; कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. आणि तिला नेसायला, स्वच्छ, शुभ्र, चमकणारे तलम तागाचे वस्त्र दिले आहे. (हे तलम वस्त्र म्हणजे पवित्रजनांच्या नीतिमत्त्वाची कामे होत.) आणि तो देवदूत मला म्हणाला, “लिहीः कोकऱ्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत.” आणि तो मला म्हणाला, “ही देवाची खरी वचने आहेत.”

सामायिक करा
प्रकटी 19 वाचा

प्रकटी 19:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यानंतर मी ऐकले, स्वर्गात जणू काही एक मोठा जनसमुदाय गर्जना करून म्हणत आहे: “हाल्लेलूयाह! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या परमेश्वराची आहेत! कारण त्यांचे निर्णय सत्य व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली होती, तिला त्यांनी दंड केला आहे आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.” आणि पुन्हा त्यांनी घोषणा केली: “हाल्लेलूयाह” तिचा धूर सदासर्वकाळ वर जात आहे. तेव्हा ते चोवीस वडीलजन व चार सजीव प्राणी यांनी राजासनावर बसलेल्या परमेश्वरासमोर दंडवत घालून त्यांना नमन करीत म्हटले, “आमेन! हाल्लेलूयाह!” तेव्हा राजासनातून एक वाणी निघाली. ती म्हणाली, “परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या त्यांच्या सर्व लहान थोर सेवकहो, आपल्या परमेश्वराचे स्तवन करा.” नंतर मी एका विराट लोक समुदायाची, पाण्याच्या उसळत्या प्रवाहासारखी गर्जना किंवा विजांच्या प्रचंड गडगडाटासारखी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “हाल्लेलूयाह, कारण आमचे प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, राज्य करतात! चला, आपण आनंदोत्सव करू, उल्लास करू व त्यांचे गौरव करू, कारण कोकर्‍याच्या विवाहाची वेळ झाली आहे. त्यांच्या वधूने स्वतःला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयास दिले आहे,” ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र लोकांची नीतिकृत्ये आहेत. तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, असे लिही “कोकराच्या विवाहाच्या मेजवानीस आमंत्रित केलेले ते धन्य!” तो मला असेही म्हणाला, “ही परमेश्वराची सत्यवचने आहेत.”

सामायिक करा
प्रकटी 19 वाचा

प्रकटी 19:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘हालेलूया!’ तारण, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही प्रभू जो आमचा देव ह्याची आहेत; कारण ‘त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे’ व ‘नीतीचे’ आहेत; ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आणि आपल्या ‘दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.”’ ते दुसर्‍यांदा म्हणाले, “हालेलूया! तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.” तेव्हा ते चोवीस वडील व ते चार प्राणी उपडे पडून ‘राजासनावर बसलेल्या’ देवाला नमन करताना म्हणाले, “आमेन; हालेलूया!” इतक्यात ‘राजासनापासून’ वाणी झाली; ती म्हणाली, “अहो आमच्या देवाची ‘भीती बाळगणार्‍या सर्व लहानथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”’ तेव्हा ‘जणू काय’ मोठ्या ‘समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी’ व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला; तो म्हणाला, “‘हालेलूया; कारण’ सर्वसमर्थ आमचा ‘प्रभू’ देव ह्याने ‘राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद’ व ‘उल्लास करू’ व त्याचा गौरव करू; कारण कोकर्‍याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे;” ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, “हे लिही की, कोकर्‍याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.”

सामायिक करा
प्रकटी 19 वाचा

प्रकटी 19:1-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जणू एक मोठी वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “देवाचा गौरव असो! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत!” कारण त्याचे न्याय सत्याचे व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्यायविवाडा त्याने केला आहे आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे. ते दुसऱ्यांदा म्हणाले, “हालेलूया! तिला भस्मसात करणाऱ्या ज्वालांचा धूर युगानुयुगे वर चढत आहे!” तेव्हा ते चोवीस वडीलजन व ते चार प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाची आराधना करीत म्हणाले, “आमेन! हालेलूया!” इतक्यात राजासनाकडून वाणी झाली, ती म्हणाली, “अहो, आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लाहनथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.” तेव्हा जणू काही मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला, त्याने घोषणा केली, “हालेलूया! कारण सर्वसमर्थ आमचा प्रभू देव ह्याने राजाधिकार हाती घेतला आहे.” आपण आनंद करू व उ्रास करू व त्याचा गौरव करू कारण कोकराचे लग्न आले आहे आणि त्याच्या वधूने स्वतःला सजविले आहे, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहे, ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र लोकांची नीतिकृत्ये आहेत. तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.”

सामायिक करा
प्रकटी 19 वाचा