YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 16:1-17

प्रकटी 16:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर मी ‘मंदिरातून निघालेली एक’ मोठी ‘वाणी’ ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा, देवाच्या ‘क्रोधाच्या’ सात वाट्या ‘पृथ्वीवर ओता.”’ तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या ‘लोकांना’ वाईट व ‘घाणेरडे फोड आले.’ दुसर्‍याने आपली वाटी समुद्रात ओतली, तेव्हा ‘समुद्र’ मृत माणसाच्या रक्तासारखा ‘रक्तमय झाला’ आणि ‘त्यातील’ सर्व प्राणी ‘मरून गेले.’ तिसर्‍याने आपली वाटी ‘नद्या’ व पाण्याचे झरे ह्यांत ओतली, ‘आणि त्यांचे रक्त झाले.’ तेव्हा मी जलांच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, “हे प्रभू, ‘जो तू पवित्र आहेस, होतास व असणार’, त्या तू असा न्यायनिवाडा केलास म्हणून तू ‘न्यायी’ आहेस; कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.” नंतर मी वेदीला1 असे बोलताना ऐकले, “हो, ‘हे प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझे न्याय सत्य’ व ‘नीतीचे’ आहेत!” चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली; आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली. माणसे कडक उन्हाने करपून गेली; तेव्हा त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही. पाचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य ‘अंधकारमय झाले,’ आणि लोकांनी वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या; आणि आपल्या वेदनांमुळे व आपल्या फोडांमुळे त्यांनी ‘स्वर्गाच्या’ देवाची निंदा केली, आणि आपल्या कृत्यांबद्दल पश्‍चात्ताप केला नाही. सहाव्याने आपली वाटी ‘फरात महानदावर’ ओतली तेव्हा ‘सूर्याच्या उगवतीपासून’ येणार्‍या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे ‘पाणी आटून गेले.’ नंतर ‘बेडकासारखे’ असलेले तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून निघताना मी पाहिले. ते चिन्हे दाखवणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात. (“पाहा, जसा चोर येतो, तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य!”) त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मोठी ‘वाणी [स्वर्गाच्या] मंदिरातून,’ राजासनापासून निघाली; ती म्हणाली, “झाले!”

सामायिक करा
प्रकटी 16 वाचा

प्रकटी 16:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मी परमपवित्रस्थानातून एक मोठी वाणी ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा आणि देवाच्या रागाच्या या सात वाट्या पृथ्वीवर ओता.” मग पहिला देवदूत गेला आणि त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली आणि ज्या लोकांवर त्या पशूचे चिन्ह होते व जे त्याच्या मूर्तीला नमन करीत असत त्यांना अतिशय कुरूप आणि त्रासदायक फोड आले. नंतर, दुसऱ्या देवदूताने आपली वाटी समुद्रात ओतली आणि त्याचे मरण पावलेल्या मनुष्याच्या रक्तासारखे रक्त झाले आणि समुद्रात जगणारे सर्व जीव मरण पावले. तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्यांवर व पाण्याच्या झऱ्यांवर ओतली, “आणि त्यांचे रक्त झाले” आणि माझ्या कानी आले की, जलाशयांचा देवदूत म्हणाला, तू जो पवित्र आहेस आणि होतास तो तू नीतिमान आहेस, कारण तू असा न्याय केलास. कारण त्यांनी पवित्रजनांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त पाडले, आणि तू त्यांना रक्त प्यायला दिलेस; कारण ते याच लायकीचे आहेत. वेदीने उत्तर दिले, ते मी ऐकले की, हो, हे सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझे न्याय खरे आणि नीतीचे आहेत. चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि त्यास लोकांस अग्नीने जाळून टाकण्याची परवानगी देण्यात आली होती. लोक भयंकर उष्णतेने जळाले व त्यांनी या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा केली आणि त्यास गौरव द्यायला त्यांनी पश्चात्ताप केला नाही. पाचव्या देवदूताने आपली वाटी त्या पशूच्या राजासनावर ओतली आणि त्याचे राज्य अंधकारमय झाले, आणि त्या क्लेशांत लोकांनी आपल्या जीभा चावल्या; त्यांनी आपल्या क्लेशांमुळे आणि आपल्या फोडांमुळे स्वर्गीय देवाची निंदा केली आणि आपल्या कृतींचा पश्चात्ताप केला नाही. सहाव्या देवदूताने आपली वाटी महान फरात नदीवर ओतली आणि पूर्वेकडील राजांचा मार्ग तयार व्हावा म्हणून तिचे पाणी आटवले गेले. आणि मी बघितले की, त्या अजगराच्या मुखातून, त्या पशूच्या मुखातून आणि त्या खोट्या संदेष्ट्यांच्या मुखातून बेडकांसारखे तीन अशुद्ध आत्मे बाहेर आले. कारण हे चमत्कार करणारे दुष्ट आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या, त्या महान दिवसाच्या लढाईसाठी सर्व जगातल्या राजांना एकत्र जमवायला त्यांच्याकडे जात आहेत. पाहा, मी चोरासारखा येतो; जो जागृत राहतो आणि आपली वस्त्रे संभाळतो तो धन्य होय! नाही तर, तो उघडा फिरेल आणि ते त्याची लज्जा पाहतील. आणि त्यांनी त्यांना हर्मगिदोन असे इब्री भाषेत नाव असलेल्या एका ठिकाणी एकत्र जमवले. सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली व परमेश्वराच्या भवनामधून, राजासनाकडून एक मोठा आवाज आला; तो म्हणाला, “झाले.”

सामायिक करा
प्रकटी 16 वाचा

प्रकटी 16:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी सात देवदूतांना म्हणतांना ऐकली, “जा, परमेश्वराच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.” त्याप्रमाणे, पहिला देवदूत मंदिरातून निघाला. त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली, तेव्हा ज्या लोकांवर पशूची खूण होती व ज्यांनी त्याच्या मूर्तीला नमन केले होते, अशा प्रत्येकाला चिघळलेले आणि क्लेशदायक फोड आले. दुसर्‍या देवदूताने आपले वाटी समुद्रावर ओतली, तेव्हा समुद्राचे पाणी मेलेल्या माणसाच्या रक्तासारखे रक्तमय झाले आणि त्यातील सर्व जिवंत प्राणी मरण पावले. तिसर्‍या देवदूताने त्याची वाटी नद्यांवर आणि झर्‍यावर ओतली आणि ते पाणी रक्तमय झाले. मग मी जलांच्या देवदूताला जाहीर करताना ऐकले: “जे तुम्ही आहात, जे तुम्ही होता, ते तुम्ही हे पवित्र प्रभू, हा न्यायनिवाडा करण्यास तुम्ही न्यायी आहात. कारण त्यांनी तुमच्या पवित्र जणांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त सांडले, आणि आता तुम्ही त्यांना रक्त प्यावयास लावले आहे, त्याला ते पात्र आहेत.” नंतर वेदीला असे म्हणताना मी ऐकले: “खरोखर, हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, तुमचे न्याय न्यायी व सत्य आहेत.” मग चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सर्व माणसांना सूर्याच्या अग्नीने भाजून काढण्याची परवानगी देण्यात आली. माणसे तीव्र उष्णतेने करपून गेली, तेव्हा या पीडांवर ज्यांचे नियंत्रण आहे त्या परमेश्वराच्या नावाला शाप दिला, परंतु त्यांनी पश्चात्ताप केला नाही आणि परमेश्वराचे गौरव केले नाही. मग पाचव्या देवदूताने आपली वाटी समुद्रातील पशूच्या आसनावर ओतली. तेव्हा त्याचे संपूर्ण राज्य अंधकारमय झाले आणि त्याच्या प्रजाजनांनी असह्य वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या. आपल्या वेदना आणि फोड याबद्दल त्यांनी स्वर्गातील परमेश्वराला शाप दिले. पण आपल्या दुष्कृत्यांबद्दल पश्चात्ताप करण्याचे त्यांनी नाकारले. सहाव्या देवदूताने आपली वाटी यूफ्रेटीस महानदीवर ओतली, तेव्हा पूर्वेकडून येणार्‍या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून तिचे पाणी आटून गेले. नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, पशूच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडामधून निघताना मी पाहिले. चमत्कार करणारे हे दुरात्मे जगातील सर्व राजांकडे जाऊन सर्वसमर्थ परमेश्वराच्या दिवशी युद्धासाठी त्यांना एकत्र करतात. “पाहा! जसा चोर येतो तसा मी येईन! जे आपली वस्त्रे घालून तयार होऊन माझी वाट पाहत आहेत, ते धन्य! त्यांना नग्नावस्थेत आणि लज्जास्पद स्थितीत चालावे लागणार नाही.” मग त्या तिघांनी जगातील सर्व राजांना, हिब्रू भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. मग सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मंदिरात असलेल्या राजासनावरून एक मोठी वाणी निघाली. ती म्हणाली, “पूर्ण झाले आहे!”

सामायिक करा
प्रकटी 16 वाचा

प्रकटी 16:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर मी ‘मंदिरातून निघालेली एक’ मोठी ‘वाणी’ ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा, देवाच्या ‘क्रोधाच्या’ सात वाट्या ‘पृथ्वीवर ओता.”’ तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या ‘लोकांना’ वाईट व ‘घाणेरडे फोड आले.’ दुसर्‍याने आपली वाटी समुद्रात ओतली, तेव्हा ‘समुद्र’ मृत माणसाच्या रक्तासारखा ‘रक्तमय झाला’ आणि ‘त्यातील’ सर्व प्राणी ‘मरून गेले.’ तिसर्‍याने आपली वाटी ‘नद्या’ व पाण्याचे झरे ह्यांत ओतली, ‘आणि त्यांचे रक्त झाले.’ तेव्हा मी जलांच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, “हे प्रभू, ‘जो तू पवित्र आहेस, होतास व असणार’, त्या तू असा न्यायनिवाडा केलास म्हणून तू ‘न्यायी’ आहेस; कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.” नंतर मी वेदीला1 असे बोलताना ऐकले, “हो, ‘हे प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था, ‘तुझे न्याय सत्य’ व ‘नीतीचे’ आहेत!” चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली; आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली. माणसे कडक उन्हाने करपून गेली; तेव्हा त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही. पाचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य ‘अंधकारमय झाले,’ आणि लोकांनी वेदनांमुळे आपल्या जिभा चावल्या; आणि आपल्या वेदनांमुळे व आपल्या फोडांमुळे त्यांनी ‘स्वर्गाच्या’ देवाची निंदा केली, आणि आपल्या कृत्यांबद्दल पश्‍चात्ताप केला नाही. सहाव्याने आपली वाटी ‘फरात महानदावर’ ओतली तेव्हा ‘सूर्याच्या उगवतीपासून’ येणार्‍या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे ‘पाणी आटून गेले.’ नंतर ‘बेडकासारखे’ असलेले तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्ट्याच्या तोंडातून निघताना मी पाहिले. ते चिन्हे दाखवणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात. (“पाहा, जसा चोर येतो, तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य!”) त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. सातव्याने आपली वाटी अंतराळात ओतली; तेव्हा मोठी ‘वाणी [स्वर्गाच्या] मंदिरातून,’ राजासनापासून निघाली; ती म्हणाली, “झाले!”

सामायिक करा
प्रकटी 16 वाचा

प्रकटी 16:1-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

पुढे मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली. ती त्या सात देवदूतांना म्हणाली जा, “देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता!” पहिल्या देवदूताने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीची आराधना करणाऱ्या लोकांना दुर्गंधी येणारे व वेदनादायक फोड आले. नंतर दुसऱ्या देवदूताने आपली वाटी समुद्रात ओतली, तेव्हा समुद्र मृत माणसाच्या रक्तासारखा रक्तमय झाला आणि त्यातील सर्व प्राणीमात्र मरून गेले. तदनंतर तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे ह्यात ओतली आणि त्यांचे रक्त झाले. तेव्हा मी जलाच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, “जो तू आहेस व होतास, तो तू पवित्र आहेस! तू असा न्यायनिवाडा केला म्हणून तू न्यायी आहेस! त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे रक्त पाडले आणि तू त्यांना रक्त प्यावयास लावले आहे. हीच त्यांची योग्यता आहे!” नंतर मी वेदीला असे उत्तर देताना ऐकले, “होय, हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, तुझे निर्णय सत्य व न्याय्य आहेत.” त्यानंतर चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपून टाकण्याची मुभा देण्यात आली. माणसे कडक उष्णतेने करपून गेली, तेव्हा त्या विपत्तीवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची माणसांनी निंदा केली परंतु त्यांनी पश्चात्ताप केला नाही की देवाचा गौरव केला नाही. पाचव्या देवदूताने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य अंधकारमय झाले आणि लोकांनी वेदनांमुळे त्यांच्या जिभा चावल्या. त्यांच्या वेदनांमुळे व फोडांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली परंतु आपल्या कृत्यांबद्दल पश्चात्ताप केला नाही. सहाव्या देवदूताने आपली वाटी फरात महानदीवर ओतली तेव्हा पूर्वेकडून येणाऱ्या राजांचा मार्ग सिद्ध व्हावा म्हणून त्या महानदीचे पाणी आटून गेले. नंतर बेडकासारखे दिसणारे तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या, श्वापदाच्या व खोट्या संदेष्ट्यांच्या तोंडांतून निघताना मी पाहिले. ते चमत्कार करणारे मृतांचे आत्मे आहेत, ते सर्वसमर्थ देवाच्या त्या महान दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करावयास त्यांच्याकडे बाहेर जातात. “पाहा, जसा चोर येतो, तसा मी येईन! आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे सांभाळतो तो धन्य!” नंतर हिब्रू भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्रित केले. त्यानंतर सातव्या देवदूताने आपली वाटी हवेत ओतली, तेव्हा उच्च वाणी मंदिरातील राजासनापासून निघाली, ती म्हणाली: “झाले!”

सामायिक करा
प्रकटी 16 वाचा