प्रकटी 12:1-6
प्रकटी 12:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले; सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता. ती स्त्री गरोदर होती व बाळंतपणाच्या वेदनांनी ती ओरडत होती. आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! तेथे एक मोठा, लाल अजगर; त्यास सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील तिसरा हिस्सा तारे खाली ओढून काढले आणि त्यांना पृथ्वीवर पाडले; आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्यापुढे उभा राहिला. आणि सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवील अशा मुलास म्हणजे पुसंतानास तिने जन्म दिला; त्या मुलाला देवाकडे व त्याच्या राजासनाकडे उचलून नेण्यात आले. आणि ती स्त्री रानात पळाली; तेथे तिची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे.
प्रकटी 12:1-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग स्वर्गामध्ये एक अलौकिक चिन्ह मला दिसले. सूर्य परिधान केलेली एक स्त्री मी पाहिली. तिच्या पायाखाली चंद्र होता. तिच्या डोक्यावर बारा तार्यांचा मुकुट होता. ती गर्भवती होती आणि प्रसूतिची वाट पाहत प्रसूतिवेदनांनी ओरडत होती. तोच स्वर्गामध्ये दुसरे चिन्ह दिसले: एकाएकी सात डोकी आणि दहा शिंगे असलेला एक प्रचंड अग्निवर्ण अजगर दृश्यमान झाला. त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते. त्याने आपल्या शेपटाने एकतृतीयांश तारे ओढून घेतले आणि त्यांना पृथ्वीवर खाली लोटून दिले. मग तो अजगर, त्या स्त्रीचे मूल जन्मल्या बरोबर ते खाऊन टाकावे, या उद्देशाने तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. त्या स्त्रीने एका अशा मुलाला जन्म दिला, “की जो सर्व राष्ट्रांवर लोह-राजदंडाने राज्य करणार होता.” त्या मुलाला परमेश्वरापुढे व राजासनापुढे उचलून नेण्यात आले. ती स्त्री अरण्यात पळून गेली. तेथे तिचे 1,260 दिवस पोषण करण्याकरिता परमेश्वराने तिच्यासाठी एक जागा तयार करून ठेवली होती.
प्रकटी 12:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले ते हे : एक स्त्री दिसली, ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा तार्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि ‘वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती.’ स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले ते हे : पाहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला सात डोकी व ‘दहा शिंगे’ होती, आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते. त्याच्या शेपटाने ‘आकाशातील तार्यांपैकी एक तृतीयांश तारे’ ओढून काढून ते ‘पृथ्वीवर पाडले’; ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणार्या स्त्रीपुढे उभा राहिला होता. सर्व ‘राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील’ असा पुत्र म्हणजे पुंसंतान ती प्रसवली; ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली; तेथे तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे.
प्रकटी 12:1-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर स्वर्गात एक महान व रहस्यमय दृश्य दिसले. तिथे एक स्त्री दिसली. तिने सूर्यतेज पांघरलेले होते आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या वेदनांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक रहस्यमय दृश्य दिसले ते हे: पाहा, एक मोठा तांबूस अजगर दिसला, त्याला सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर सात मुकुट होते. त्याच्या शेपटीने त्याने आकाशातील ताऱ्यांपैकी एक तृतीयांश तारे ओढून काढले व ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रसूत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला. सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे हिसकावून नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. त्या ठिकाणी तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेली तिची एक जागा होती.