स्तोत्रसंहिता 98:7-9
स्तोत्रसंहिता 98:7-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत. नद्या टाळ्या वाजवोत, आणि पर्वत हर्षनाद करोत. परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील.
स्तोत्रसंहिता 98:7-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
महासागर व त्यामधील सर्व स्तुतीचा हर्षनाद करोत, तसेच पृथ्वी आणि त्यावर राहणारे सर्व प्राणीही करोत. नदीच्या लाटा टाळ्या वाजवोत, डोंगर व टेकड्या परमेश्वरासमोर हर्षगान करोत; ते सर्व याहवेहच्या उपस्थितीमध्ये गावोत; कारण पृथ्वीचा रास्त न्याय करण्यासाठी ते येत आहेत. ते जगाचा आणि सर्व मनुष्यप्राण्यांचा न्याय त्यांच्या धार्मिकतेने व समानतेने करतील.
स्तोत्रसंहिता 98:7-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
समुद्र व त्यातील सर्वकाही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करोत. नद्या टाळ्या वाजवोत; पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत; कारण तो पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे; तो जगाचा न्याय यथार्थतेने करील, व लोकांचा न्याय सरळपणे करील.