स्तोत्रसंहिता 98:4-8
स्तोत्रसंहिता 98:4-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा. परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, वीणेवर मधुर स्वराने गायन करा. कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा. समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत. नद्या टाळ्या वाजवोत, आणि पर्वत हर्षनाद करोत.
स्तोत्रसंहिता 98:4-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अगे पृथ्वी, याहवेहकरिता अत्यानंदाने हर्षोल्लास कर, संगीतासह उचंबळून हर्षगीत गा; वीणेवरील संगीताच्या साथीने याहवेहचे स्तवन करा, वीणेच्या तालात आणि गीतांच्या सुरात गा, शिंगे आणि कर्णे हर्षनादाचा गजर करोत— याहवेह जे राजा आहेत, यांच्यापुढे आनंदाचा जयघोष करा. महासागर व त्यामधील सर्व स्तुतीचा हर्षनाद करोत, तसेच पृथ्वी आणि त्यावर राहणारे सर्व प्राणीही करोत. नदीच्या लाटा टाळ्या वाजवोत, डोंगर व टेकड्या परमेश्वरासमोर हर्षगान करोत
स्तोत्रसंहिता 98:4-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने, आनंदाने गा; त्याची स्तोत्रे गा. परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा, वीणेवर सुस्वर स्तोत्र गा. कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. समुद्र व त्यातील सर्वकाही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करोत. नद्या टाळ्या वाजवोत; पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत