स्तोत्रसंहिता 98:1-3
स्तोत्रसंहिता 98:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधला आहे. परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे; राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. त्याने इस्राएलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता ह्यांचे स्मरण केले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
स्तोत्रसंहिता 98:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे. परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे. त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
स्तोत्रसंहिता 98:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहप्रीत्यर्थ एक नवे गीत गा, कारण त्यांनी अद्भुत कार्य केले आहे; त्यांच्या उजव्या हाताने व पवित्र बाहूंनी तारण मिळविण्याचे कार्य केले आहे. याहवेहने त्यांचे तारण सर्व पृथ्वीला दाखविले आहे, आणि राष्ट्रांसमक्ष आपली नीतिमत्ता प्रकाशित केली आहे. इस्राएलवरील त्यांची प्रीती आणि त्यांच्या विश्वसनीयतेचे त्यांना स्मरण झाले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आपल्या परमेश्वराने केलेले तारण पाहिले आहे.