स्तोत्रसंहिता 94:16-19
स्तोत्रसंहिता 94:16-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्यासाठी दुष्कर्म्यांविरुद्ध कोण उठेल? अनीती करणार्यांविरुद्ध माझ्यासाठी कोण उभा राहील? परमेश्वर मला साहाय्य झाला नसता तर माझ्या जिवाची वस्ती नि:शब्दस्थानी केव्हाच झाली असती. “माझा पाय घसरला,” असे मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला. माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करते.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 94 वाचास्तोत्रसंहिता 94:16-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल? अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल? जर परमेश्वराने मला मदत केली नसती, तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता. जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे, तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो. जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 94 वाचा