स्तोत्रसंहिता 92:1-5
स्तोत्रसंहिता 92:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराची उपकारस्तुती करणे आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे. सकाळी तुझे वात्सल्य, आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे. दहा तारांचे वाद्य, वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत.
स्तोत्रसंहिता 92:1-5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहची स्तुती गाणे, आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे. प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची, आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा, दशतंत्री सारंगीच्या संगीताद्वारे, आणि वीणेच्या तालावर गायन-वादन करीत आहे. हे याहवेह, तुमच्या कृत्त्यांनी तुम्ही मला उल्हासित करता; तुमच्या हाताने केलेल्या कार्यांमुळे मी हर्षगीते गात आहे. हे याहवेह, तुमची कृत्ये किती महान आहेत! तुमचे विचार किती गहन आहेत!
स्तोत्रसंहिता 92:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचे उपकारस्मरण करणे, हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभातसमयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे, दशतंतुवाद्य, सतार व वीणा ह्यांच्या साथीने, गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहेस; तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जयजयकार करतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत. तुझे विचार फार गहन आहेत