स्तोत्रसंहिता 88:13-15
स्तोत्रसंहिता 88:13-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते. हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस? मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे; मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 88 वाचास्तोत्रसंहिता 88:13-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तर, हे परमेश्वरा, तुझा धावा करतो; प्रातःकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते. हे परमेश्वरा, तू माझ्या जिवाचा त्याग का करतोस? तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस? मी तरुणपणापासून पीडा पावून मरणोन्मुख झालो आहे; तुझ्या भीतीने मी व्याकूळ झालो आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 88 वाचा