YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 80:1-7

स्तोत्रसंहिता 80:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवितोस तो तू लक्ष दे. जो तू करुबांच्यावर बसतोस, आम्हावर प्रकाश पाड. एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर तू आपल्या सामर्थ्याने खळबळ उडव; ये व आम्हास वाचव. हे देवा, तू आमचा पुन्हा स्वीकार कर; आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्ही वाचू. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे लोक प्रार्थना करीत असता तू किती वेळ कोपलेला राहशील? तू त्यांना अश्रूंची भाकर खावयास दिली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आसवे पिण्यास दिली आहेत. तू आम्हास आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त करतोस, आणि आमचे शत्रू आपसात आम्हास हसतात. हे सेनाधीश देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर. आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्हास वाचव.

स्तोत्रसंहिता 80:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवतोस, तो तू कान दे; जो तू करूबारूढ आहेस तो तू आपले तेज प्रकट कर. एफ्राईम, बन्यामीन व मनश्शे ह्यांच्यासमक्ष तू आपला पराक्रम दाखव, आणि आम्हांला तारायला ये. हे देवा, तू आम्हांला परत आण; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे लोक प्रार्थना करीत असता तू कोठवर कोपायमान राहणार? तू त्यांना अश्रुरूप अन्न खायला दिले आहे आणि त्यांना माप पुरे भरून आसवे प्यायला दिली आहेत. तू आम्हांला आमच्या शेजार्‍यांच्या कलहास कारण करतोस; आणि आमचे वैरी आमचा यथेच्छ उपहास करतात. हे सेनाधीश देवा, तू आम्हांला परत आण; तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू.