स्तोत्रसंहिता 77:9-13
स्तोत्रसंहिता 77:9-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देव दया करण्याचे विसरला का? त्याच्या रागाने त्याचा कळवळा बंद केला आहे का? मी म्हणालो, हे माझे दुःख आहे, आमच्या प्रती परात्पराचा उजवा हात बदलला आहे पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन; मी तुझ्या पुरातन काळच्या आश्चर्यकारक कृत्यांविषयी विचार करीन. मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन, आणि मी त्यावर काळजीपूर्वक विचार करीन. हे देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत, आमच्या महान देवाशी कोणता देव तुलना करेल.
स्तोत्रसंहिता 77:9-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर आपली दया दाखविण्याचे विसरले आहेत काय? क्रोधाने त्यांनी आपला कळवळा रोखून धरला आहे काय?” सेला मग मी विचार केला, “खरेच माझ्या दुःखाचे कारण हे आहे: की सर्वोच्च प्रभू परमेश्वराने त्यांचा उजवा हात रोखला आहे. मी याहवेहच्या कृत्यांचे स्मरण करेन; पुरातन काळात त्यांनी केलेल्या अद्भुतकृत्यांची मी आठवण करेन. मी तुमच्या सर्व कृत्यांचे मनन करेन आणि मी तुमच्या सर्व महत्कार्यांचा विचार करेन.” हे परमेश्वरा, तुमचे मार्ग पवित्र आहेत. आपल्या परमेश्वरासारखा समर्थ ईश्वर कोणी आहे का?
स्तोत्रसंहिता 77:9-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देव कृपा करायचे विसरला काय? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा आवरून धरला काय?” (सेला) “परात्पराचे सामर्थ्य खालावले आहे”1 असे वाटून मला दु:ख झाले. मी परमेशाची महत्कृत्ये वर्णन करीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्भुत कृत्यांचे स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन. हे देवा, तुझा मार्ग पवित्र2 आहे; देवासारखा थोर देव कोण आहे?