स्तोत्रसंहिता 69:13-16
स्तोत्रसंहिता 69:13-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे. चिखलातून मला काढ, मला रुतू देऊ नकोस; मला माझ्या द्वेष्ट्यांपासून मुक्त कर व खोल पाण्यातून मला काढ. पाण्याचा लोंढा माझ्यावरून जाऊ देऊ नकोस; दलदलीत मला खचू देऊ नकोस; गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नकोस. हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे; आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ.
स्तोत्रसंहिता 69:13-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे. मला चिखलातून बाहेर काढ, आणि त्यामध्ये मला बुडू देऊ नकोस; माझा तिरस्कार करणाऱ्यापासून मला वाचव. खोल पाण्यापासून मला काढ. पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस, खोल डोह मला न गिळो. खाच आपले तोंड माझ्यावर बंद न करो. हे परमेश्वरा, मला उत्तर दे, कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे.
स्तोत्रसंहिता 69:13-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरी याहवेह, तुमच्या प्रसन्नतेच्या वेळेसाठी मी तुमच्याकडे प्रार्थना करीत आहे; हे परमेश्वरा तुमच्या महान प्रीती निमित्त तुमच्या विश्वसनीय तारणाद्वारे मला उत्तर द्या. मला या दलदलीतून बाहेर काढा; मला त्यामध्ये बुडू देऊ नका; माझा द्वेष करणार्यापासून मला वाचवा. खोल पाण्यातून मला बाहेर काढा. महापुरांच्या लोंढ्यात मला बुडू देऊ नका किंवा डोहाला मला गिळू देऊ नका; गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नका. याहवेह, तुमच्या प्रीतिपूर्ण दयेने माझ्या प्रार्थनेची उत्तरे द्या; तुम्ही विपुल कृपेने आपले मुख माझ्याकडे करा.