स्तोत्रसंहिता 66:1-5
स्तोत्रसंहिता 66:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा; त्याच्या नावाचा महिमा गा; त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा. देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत, तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात. सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील; आणि तुझी स्तोत्रे गातील; ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील. अहो या, आणि देवाची कार्ये पहा; तो मनुष्यांच्या मुलांस आपल्या कृत्यांनी धाक बसवतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 66 वाचास्तोत्रसंहिता 66:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, देवाचा जयजयकार करा. त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा. देवाला म्हणा, “तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात. सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील; तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.” (सेला) अहो या, देवाची कृत्ये पाहा; तो आपल्या कृतींनी मानवजातीस धाक बसवतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 66 वाचा