स्तोत्रसंहिता 63:3-6
स्तोत्रसंहिता 63:3-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे; माझे ओठ तुझे स्तवन करतील. मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन; तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन. मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल; आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील. मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करतो, व प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करीत असतो.
स्तोत्रसंहिता 63:3-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण तुझी कराराची विश्वसनियता ही जीवनापेक्षा उत्तम आहे; माझे ओठ तुझी स्तुती करतील. म्हणून मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला धन्यवाद देईन; मी आपले हात तुझ्या नावात उंच करीन. माझा जीव मज्जेने आणि चरबीने व्हावा तसा तृप्त होईल; माझे तोंड आनंदी ओठाने तुझी स्तुती करतील. मी आपल्या अंथरुणावर तुझ्याविषयी विचार करतो आणि रात्रीच्या समयी त्यावर मनन करतो.
स्तोत्रसंहिता 63:3-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण तुमची प्रीती जीवनाहून उत्तम आहे, माझे ओठ तुमचे गौरव करतील. माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला धन्यवाद देईन आणि माझे हात तुमच्या नावाने उंच करेन. उत्कृष्ट भोजनाने व्हावे तसा मी तृप्त होईल; गीत गाणार्या ओठांनी मी तुमची स्तुती करेन. माझ्या बिछान्यावर मी तुमचे स्मरण करतो; रात्रीच्या प्रत्येक प्रहरी मी तुमचे मनन करतो.